आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात सोमवारी 3721 नवे रुग्ण, तर 62 मृत्यूंची नोंद, औरंगाबादेत 11 बाधितांचा मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुक्तांची संख्या 67,706 झाली असून बरे होण्याचे प्रमाण 49.86

राज्यात सोमवारी ३७२१ नवे रुग्ण, तर ६२ मृत्यूंची नोंद झाली. एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३५,७९६ झाली. दिवसभरात १९६२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. कोरोनामुक्तांची संख्या ६७,७०६ झाली असून बरे होण्याचे प्रमाण ४९.८६ आहे. एकूण ६२८३ मृत्यू झाले आहेत.

मराठवाड्यात सोमवारी १५८ नव्या रुग्णांची नोंद झाली. औरंगाबादेतील ११ आणि उस्मानाबादेतील एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला.

जालना जिल्ह्यात २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात टेंभुर्णीतील ९ रुग्णांचा समावेश असून आहे. तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील ५५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात ४ नवीन रुग्णही सापडले. नांदेड जिल्ह्यात सोमवारी ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ३१७ झाली.

औरंगाबाद : ३,६५६ रुग्ण

जिल्ह्यात साेमवारी ११ रुग्णांचे मृत्यू झाले त्यामुळे आता एकूण बळींची संख्या २०२ पर्यंत गेली आहे. दिवसभरात १२६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३,६५६ वर गेली आहे. यापैकी १९६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मंत्री धनंजय मुंडे कोरोनामुक्त

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंचा दुसरा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांच्यासमवेत दोन सचिव, दोन वाहनचालक व एका अंगरक्षकासही घरी सोडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...