आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर्व काळजी घेऊन याची लागण झाली तरी वेळेत निदान आणि उपचार घेतले तरी अवघ्या आठवडाभरात यावर मात करता येऊ शकते. अचूक निदानासाठी आरटीपीसीआर, अँटिजन या चाचण्याच अधिकृत आहेत. पण विलगीकरणात किंवा रुग्णालयात भरती केले जाईल या भीतीने नांदेड, औरंगाबादसारख्या ठिकाणी अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याविना सीआरपी (सी रिअॅक्टिव्ह प्रोटीन) चाचणी करून कोरोना झाला आहे की नाही, याची खात्री करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दुसरीकडे अधिकृत चाचण्या न करता सीआरपीवर काहीही कळत नाही. त्यामुळे असा प्रकार करून आपण जीव धोक्यात घालत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनावर मात करायची असेल तर त्याचे निदान करून योग्य वेळेत उपचार घेणे अत्यंत आवश्यक असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व वैद्यकीय तज्ज्ञही अचूक निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याचा वेळोवेळी सल्ला देतात. कोरोनाची सौम्य, तीव्र लक्षणे असल्यास आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन टेस्ट या अधिकृत चाचण्याच करायला हव्यात. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर योग्य उपचार घ्यायला हवेत. पण नांदेडमध्ये तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याविना अनेक जण लॅबमध्ये जाऊन सीआरपी करून घेत आहेत. यातून कोरोनाचे निदान होत नसून फुप्फुसातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून प्रकृती अधिक बिघडण्याचा धोका निर्माण होत आहे.
चाचण्यांमधील फरक काय
आरटीपीसीआर चाचणी : रिअल टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन-पॉलिमर्स चेन रिअॅक्शन चाचणी म्हणजे आरटीपीसीआर. ६ तासांत अचूक निदान शक्य. यात Ribonucleic acid अर्थात आरएनए (RNA) तपासले जाते.
आरटीपीसीआरमधून अचूक निदान
सीआरपी नॉर्मल असला तरी आजार वाढला नाही असे होत नाही. ताप, संधिवात किंवा इतर आजार असला तरी रक्तातील सीआरपी वाढलेली दिसू शकते. आरटीपीसीआर चाचणीतूनच कोरोनाबाबत सर्वात अचूक निदान होते. अँटिजनही केली जाते. लक्षणे असताना सीआरपीला अवैज्ञानिक पद्धतीने गृहीत धरत असाल तर अत्यंत चुकीचे अाहे. कुठलीही चाचणी डाॅक्टरांच्या सल्लाशिवाय करू नका. - डाॅ. अानंद देशमुख, एम.डी. मेडिसिन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.