आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:ऑक्टोबर ते मार्च : मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर, नाशकात सर्वाधिक कोरोना बळी

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या सहा महिन्यांच्या काळात राज्यात कोरोनाने 19078 बळी घेतले.

राज्यात एप्रिल २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनामुळे राज्यात गेल्या वर्षभरात एकूण ५७०२८ मृत्यू झाले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाने पहिली शिखरावस्था गाठली होती. राज्यात ३० सप्टेंबर २०२० अखेर कोरोनाने ३५,५१७ बळी घेतले होते. त्यानंतर कोरोनाचा जोर काहीसा कमी झाला. फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाने राज्यात पुन्हा तांडव सुरू केले. ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ या सहा महिन्यांच्या काळात राज्यात कोरोनाने १९०७८ बळी घेतले. ऑक्टोबर ते मार्च या काळात मुंबई, पुणे, नागपूरसह नाशिक, औरंगाबाद. नगर, सोलापूर या जिल्ह्यांत सर्वाधिक बळी गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...