आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोराेनाची लाट:राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 14.74 टक्के रुग्ण मराठवाड्यात; औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांचा रिकव्हरी रेट सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 च्या पातळीवर

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उस्मानाबाद, परभणी, लातूर, बीड जिल्ह्यांचा मृत्युदर चिंताजनक; औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यांत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढत असताना, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी १४.७४ टक्के रुग्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात आहेत. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील रिकव्हरी दर ऑक्टोबर २०२० च्या स्तरावर पोहोचला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.९५ टक्के असताना नांदेड, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील हा दर चिताजनक पातळीत पोहोचला आहे.

राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्युदर दोन टक्के असताना बीड, परभणी, उस्मानाबाद आणि लातूर या चार जिल्ह्यांत मृत्युदर राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त असल्याने चिंतेत भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढणारी सक्रिय रुग्णांची संख्या पाहता मराठवाडा जणू कोरोनावाडा झाल्याचे मार्च अखेरचे चित्र आहे.

रिकव्हरी दर : पहिली लाट टिपेवर असताना अशीच स्थिती

जानेवारी- फेब्रुवारीत ९५ टक्क्यांच्या आसपास असणारा कोरोना रुग्ण रिकव्हरी दर आता सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० च्या पातळीवर आला आहे. राज्याचा रिकव्हरी दर ८५.९५% असून देशात हा दर ९४.५९% आहे. त्यातुलनेत मराठवाड्यातील नांदेड ६१.१%, परभणी ६८.५ टक्के, हिंगोली ७३.३ टक्के, औरंगाबाद ७२.२ टक्के या प्रमाणात रिकव्हरी दर आहे. कोरोनाची पहिली लाट टिपेवर असतानाच्या वेळीही अशीच स्थिती होती.

मृत्युदर : उस्मानाबादेत सर्वाधिक २.९ टक्के
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील मृत्युदर चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. उस्मानाबादेत सर्वाधिक २.९ टक्के, परभणी २.६ टक्के, बीड २.४ टक्के, लातूर २.३ टक्के असा मृत्युदर आहे. राज्याचा कोरोना मृत्युदर दोन टक्के असताना ही पातळी चिंतेत भर टाकणारी आहे. हिंगोली जिल्ह्यातील मृत्युदर सर्वात कमी म्हणजे १.५ टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...