आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 4 महिन्यांत पाचपट वाढून 66.8%

औरंगाबादएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • एप्रिल महिन्यात कोरोना रुग्ण मृत्युदर गेला होता 7.5 टक्क्यांवर, ऑगस्टमध्ये घसरून झाला 3.5 टक्के

राज्यात एप्रिलपासून कोरोनाच्या संसर्गाची सुरुवात झाली. एप्रिलमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) फक्त १२.९ टक्के होते. सात ऑगस्ट रोजी हे प्रमाण ६६.८ टक्क्यांवर आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात कोरोना रुग्ण मृत्यूचा दर एप्रिलमध्ये ४.५ टक्के होता. तो घसरून आता ३.५ टक्क्यांवर आला आहे.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ लागले. सुरुवातीला मोठ्या शहरांतून हे प्रमाण जास्त होते. त्या वेळी दर १०० रुग्णांमागे ४ ते ५ रुग्ण दगावण्याचे प्रमाण होते. १२ एप्रिलला हे प्रमाण ७.५ टक्क्यांवर पोहोचले होते. मे महिन्यात मृत्युदर ४.५ ते ३.६ टक्के होता. १६ जून रोजी मृत्युदर पुन्हा वाढून ४.९ टक्क्यांवर पोहोचला. जुलैमध्ये मृत्युदर ४.५ ते ३.६ टक्के असा राहिला. सात ऑगस्ट रोजी मृत्युदर ३.५ टक्क्यांवर होता.

कोरोनावर मात करण्याचे प्रमाण सातत्याने वाढतेय

राज्यातील एप्रिल ते सात ऑगस्टपर्यंतची राज्य सरकारची आकडेवारी पाहता कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. एप्रिलमध्ये १० ते १२ टक्के असणारा रिकव्हरी रेट मेअखेरीस ४३.३ टक्क्यांवर पोहोचला. जूनअखेरीस रिकव्हरी रेटने ५० टक्क्यांचा टप्पा आेलांडला. ३० जुलै रोजी ६०.४ टक्के असलेला रिकव्हरी रेट सात ऑगस्टला ६६.८ टक्क्यांवर आला आहे.

जिल्हा : रिकव्हरी रेट (%)

 • अकोला : ८०.५
 • मुंबई : ७७.६
 • जालना : ७४.२
 • अमरावती : ६८.४
 • जळगाव : ६८.१
 • नंदुरबार : ६८
 • औरंगाबाद : ६५.९
 • नाशिक : ६३.२
 • धुळे : ६३.२
 • यवतमाळ : ५९.९
 • पुणे : ५८.९
 • बुलडाणा : ५६.४
 • सोलापूर : ५४.८
 • नगर : ५४.०
 • उस्मानाबाद : ३९.४
 • बीड : ३०.२
बातम्या आणखी आहेत...