आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:गतवर्षीपेक्षा यंदा धरणांत 10% जास्त साठा; 26% जास्त पाऊस, हवेचे दाब वाढून ऑगस्टमध्ये राज्यात पावसाचा जोर ओसरणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात यंदा ३० जुलैअखेर अपेक्षित पावसाच्या तुलनेत २६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. असे असले तरी उत्तर महाराष्ट्रातील तीन आणि विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र पावसाची मोठी तूट पडली आहे. राज्यातील एकूण धरणांत गतवर्षीच्या तुलनेत १० टक्के जास्त पाणीसाठा झाला आहे.

ऑगस्टमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता: डॉ. साबळे
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, राज्यात दोन ऑगस्टपासून हवेचे दाब वाढण्याचे संकेत आहेत. सध्या राज्याच्या उत्तरेकडे १००२ तर दक्षिणेकडे १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब आहे. दोन ऑगस्टपासून उत्तर भागातील दाब १००४ तर दक्षिण भागावरील दाब १००६ होण्याचे संकेत आहेत परिणामी राज्यात १५ ऑगस्टपर्यंत ढगाळ हवामान राहील, पावसाचे प्रमाण अल्प राहील. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसात तूट वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...