आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा 2.0 अभियान:औरंगाबाद महानगर पालिका 2 कोटींचे बक्षीस, हिंगोली नगरपालिकेला दीड कोटींचे बक्षीस

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने राबवलेल्या माझी वसुंधरा 2.0 अभियानात औरंगाबाद महापालिकेने विभागस्तरावर उच्चतम कामगिरी केली आहे. यामुळे पालिकेला 2 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याच्या महसुली व एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबादचे कौतूक करण्यात आले आहे. तर औरंगाबाद विभागात नगरपरिषद गटातून हिंगोलीने चांगली कामगिरी केल्याने त्यांना दीड कोटींचा निधी बक्षीस स्वरूपात जाहीर झाला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पाच निसर्गाशी संबंधित पंचतत्वांत होणार्‍या प्रदूषणाला कमी करण्यासाठी राज्य सरकारने माझी वसुंधरा हे अभियान 2020 पासून हाती घेतले आहे. याअंतर्गत माझी वसुंधरा 2.0 अभियान 16 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत राबवण्यात आले.

या अभियानात राज्यातील 406 स्थानिक स्वराज्य संस्था व 11,562 ग्रामपंचायती अशा एकूण 11,968 स्थानिक संस्थांनी सहभाग नोंदवला. अमृत गट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद गट, नगर पंचायत गट आणि ग्रामपंचायत गट एक व दोन या गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. यात उच्चतम कामगिरी करणार्‍या स्थानिक संस्थांना राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने 5 डिसेंबर रोजी निधी स्वरूपात पारितोषिके जाहीर केली. संबंधित विभागाचे उप सचिव संदीप कांबळे यांनी यासंबंधीचा अध्यादेश जारी केला आहे.

यात विभागस्तरावर चांगली कामगिरी केल्यामुळे औरंगाबाद पालिकेला अमृत गटातून दोन कोटींचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या पारितोषिक पात्र निधीचा खर्च कसा करावा, यासंबंधीच्या सूचनाही दिलेल्या आहेत.

विभागस्तरावर औरंगाबाद चमकले

माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये विभाग स्तरावर देखील औरंगाबादची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे यात विभागातून औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनाही स्थान मिळाले आहे. 10 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत विभागस्तरावर औरंगाबादेतील कुरूंदा गावाला 75 लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. तर 10 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात पाटोदा गावाची कामगिरी चांगली ठरली असून त्यास 50 लाख रूपयांचे पारितोषिक मिळाले आहे.

डीपीआर अनिवार्य

जाहीर पारितोषिकातून प्राप्त होणारा निधी कसा खर्च करावा, यासंबंधीच्या सूचना देखील अध्यादेशात केल्या आहेत. पंचतत्वांच्या संरक्षण व संवर्धनाचया उपाययोजनांसाठी हा निधी खर्च करावा लागेल. त्यानुसार आता पालिकेला प्राप्त होणार्‍या दोन कोटींच्या निधी खर्चाचा डीपीआर सादर करावा लागेल. यातील 50 टक्के निधी हा वृक्षारोपण,

बातम्या आणखी आहेत...