आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:अनलाॅक 5 मध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारची परवानगी, 15 ऑक्टोबरपासून आरक्षण सुविधा उपलब्ध

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे खात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या 20 ऑक्टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केले आहे

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे.

अनलाॅक ५ मध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार रेल्वे खात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या २० ऑक्टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यात मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड तपाेवन एक्स्प्रेस, पुणे-नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी उपयाेगी ठरणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठी १५ ऑक्टोबरपासून आरक्षण करता येईल.

राज्यांतर्गत या गाड्या सुरू हाेणार :

मुंबई-पुणे (डेक्कन एक्स्प्रेस), मुंबई-पुणे (इंटर सिटी), मुंबई-पुणे (सिंहगड), मुंबई-पुणे (प्रगती एक्स्प्रेस), मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर (सेवाग्राम एक्स्प्रेस), मुंबई-गोंदिया (विदर्भ एक्स्प्रेस), मुंबई-लातूर, मुंबई-सोलापूर (सिद्धेश्वर एक्स्प्रेस), मुंबई-काेल्हापूर (महालक्ष्मी एक्स्प्रेस), पुणे-सोलापूर (हुतात्मा एक्स्प्रेस), पुणे-नागपूर सुपर फास्ट, पुणे-नागपूर (गरीबरथ एक्स्प्रेस), पुणे-भुसावळ, काेल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस).

इतर गाड्यांमध्ये पुणे येथून धावणाऱ्या झेलम आणि दरभंगा एक्स्प्रेसही सुरू होणार असून मंुबईहून पंजाब, मंगलोर आणि कराईकल एक्स्प्रेसही २० ऑक्टोबरपासून सुरू होतील.

बातम्या आणखी आहेत...