MLC Election:नाशिकमध्ये सत्यजित तांबेंचा विजय, शुभांगी पाटील पराभूत, औरंगाबादेत विक्रम काळे जिंकले
2 महिन्यांपूर्वी
कॉपी लिंक
औरंगाबाद येथे मतपत्रिकांची मोजणी करताना अधिकारी.
भाजपचा पराभव झाला.
पाच जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंनी मविआच्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला. सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली असून त्यांनी 19 हजारांवर मताधिक्क्य घेत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरीही तांबेंच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण केली गेली. तर औरंगाबादेत 6 हजार 944 मतांनी विजयी झाले.
23 हजार 577 एवढी मते विक्रम काळे यांना मिळाली. त्यानी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. किरण पाटील यांना 16,643 मते मिळाली. विक्रम काळे यांनी किरण पाटील यांचा 6934 मतांनी पराभव केल्याचे आमदार सतिश चव्हाण यांनी सांगितले. याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही.
विजयानंतर सत्यजित तांबे म्हणाले की, मला आनंद वाटतोय. यश मिळालेय. मतांची टक्केवारी कमी झाली. मतांची टक्केवारी कमी झाली. मिळालेल्या यशात समाधानी आहोत.
सत्यजित तांबेंचे ट्विट
कोकणमध्ये भाजपने तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यानंतर औरंगाबादची जागाही जवळपास राष्ट्रवादीच्याच पदरात पडली असून मविआची तेथेही सरशी झाली. तर भाजपचा पराभव झाला. नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणारे सत्यजित तांबे यांचाही विजय झाला. अमरावतीत मात्र, कांटे की, टक्कर सुरू असून पिछाडीवर असलेले भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांच्या मागणीनंतर बाद मतांची पुन्हा मोजणी सुरू झाली आहे. पाच जागांपैकी एक भाजपला दोन मविआला निश्चितच झाल्या आहेत.
रणजित पाटील यांच्या मागणीनंतर अमरावतीत बाद मतांची पुन्हा मोजणी सुरू
अमरावतीसाठी झालेल्या लढतीत आठ हजारांवर अवैध मते निघाली. त्याची फेरमोजणी व्हावी अशी मागणी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार, आता पुन्हा या मतांची फेरमतमोजणी केली जात आहे. त्यामुळे अमरावतीचा अंतीम निकाल येण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.
कुठे कोण विजयी
विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघामध्ये भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला. पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झालेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या नागो गाणार यांचा सात हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला. तर औरंगाबादेत विक्रम काळे चौथ्यांदा विजयी झाले आहेत. आता विजयाची केवळ औपचारिकताच बाकी आहे.
नागपूरचा पराभव भाजपच्या जिव्हारी
भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय असणाऱ्या नागपूरमध्ये झालेला पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. भाजपला बालेकिल्ल्यात हा दणका बसला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर नागपूरमधल्या पराभवाचे विश्लेषण करू, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने - सामने आले आहेत.
LIVE UPDATES
मराठवाडा शिक्षक मतदार संघात 12 व्या फेरी अखेर विक्रम काळे 6920 मतांनी आघाडीवर आहेत.बाराव्या फेरीत काळे यांना 21102 मते मिळाली आहेत. तर तर मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 14 हजार 128 मते मिळाली.
भाजपचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांना 14हजार 182 मते मिळाली आहेत. मनोज पाटील यांची दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपचे किरण पाटील यांना मिळाल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपचे किरण पाटील दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले.
मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले. सूर्यकांत विश्वासराव आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात केवळ 54 मताचा फरक होता.
सत्यजित तांबे म्हणाले, मतदारयाद्यात नावांचा गोंधळ, कमी मतदान यामुळे मतांची टक्केवारी कमी दिसून आली. मी विजयी झाल्यानंतरच पुढील भूमिका सांगेल.
तिसऱ्या फेरीअखेर सत्यजित तांबेंकडे सुमारे 20 हजार मतांची आघाडी. कोटा पूर्ण करण्यासाठी काही मतांची गरज.
नाशिकमध्ये सत्यजित तांबेच निवडून येतील. निवडून आल्यावर भाजपसोबत जायचे की अन्य कोणासोबत, याबाबत तांबे स्वतः योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. तांबे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना जवळपास सात हजार मतांनी मागे टाकले आहे.
नाशिक पदवीधर - पहिली फेरी - एकूण मतदान - 1 लाख 29 हजार 456. वैध मते -25,259. अवैध मते - 2741. सत्यजित सुधीर तांबे -15784. शुभांगी भास्कर पाटील - 7862. रतन कचरु बनसोडे - 560. सुरेश भीमराव पवार - 225. अनिल शांताराम तेजा - 28. अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर - 51. अविनाश महादू माळी - 268. इरफान मो इसहाक - 18. ईश्वर उखा पाटील - 45. बाळासाहेब रामनाथ घोरपडे -142. ॲड. जुबेर नासिर शेख - 54. ॲड. सुभाष राजाराम जंगले - 46. नितीन नारायण सरोदे - 63. पोपट सीताराम बनकर - 24. सुभाष निवृत्ती चिंधे - 46. संजय एकनाथ माळी - 43. एकूण 25,259.
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच् मतमोडणीत सायंकाळी पाचच्या सुमारास गोंधळ निर्माण झाला. अवैध-वैध मतपत्रिकांवरून अपक्ष उमेवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. या प्रकाराने मतमोजणी केंद्राच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाला. त्यामुळे तातडीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या पाचारण केल्या...वाचा सविस्तर...
विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांना धूळ चारली. पहिल्या फेरीत अडबाले यांना 14071 मते मिळाली. तर गाणार यांना 6309 मतांवर समाधान मानावे लागले. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला आहे...वाचा सविस्तर...
बालेकिल्ला नागपूरमध्ये भाजपला दणका बसला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले विजयी झाले आहेत, असा दावा गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे दुसऱ्या फेरीच्या पहिल्या टप्प्यात आघाडीवर आहेत. येथे भाजपचे मावळते आमदार डॉ. रणजित पाटील पिछाडीवर आहेत.
नागपूरमध्ये 22 पैकी 19 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त. फक्त 3 उमेदवारांना 3408 पेक्षा जास्त मते असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयाच्या वाटेवर आहेत.
विधान परिषद निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाल्याबद्दल उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सामंत म्हणाले की, विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचा विजय हा शिंदे - फडणवीस सरकारवरील कोकणवासीयांनी दाखविलेला विश्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. फक्त त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जादू का चालली नाही, असा सवाल एक खोचक ट्विट करून विचारला आहे.
नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयाच्या वाटेवर आहेत. कोणत्याही क्षणी त्यांच्या विजयाची घोषणा होऊ शकते. अडबाले यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नागो गाणार यांच्यापेक्षा दुप्पट मते घेतल्याचे समजते....वाचा सविस्तर...
नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होत आहे. सध्या या ठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.
अमरावतीमध्ये भाजप आणि मविआत आता अटीतटीची लढाई सुरू आहे. आतापर्यंत 28 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये मविआचे धीरज लिंगाडे यांना 680 मते अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. धीरज लिंगाडे यांना 11,992 तर, भाजपचे डॉक्टर रणजीत पाटील यांना 11,312 मते मिळाली आहेत.
औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे 19 हजार 768 मतांसह आघाडीवर आहेत. भाजपचे किरण पाटील 13, 247 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी अनपेक्षितरित्या 13 हजार 247 मते मिळवली आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोणाचा विजय होणार?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे....वाचा सविस्तर...
नागपुरात मविआचे उमेदवार सुधाकर आडबाले भरभक्कम 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत. सुधाकर आडबाले यांना 13 हजार मते मिळाली आहेत. भाजपचे ना. गो. गाणार यांच्याशी त्यांची लढत होत आहे. नागपुरात आडबाले विजयी होण्याची शक्यता आहे. सुधाकर आडबाले यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरू केला आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळे आपला विजय झाल्याची घोषणा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे. वाचा सविस्तर
विजयानंतर कोकण शिक्षक मतदारसंघाचे भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे.
कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या विजयामुळे शेकापला धक्का बसला आहे. शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना 9 हजार 500 मते मिळाली आहेत.
मराठवाडा शिक्षक मतदार संघात पहिल्या दोन तासांत अनपेक्षितरित्या सूर्यकांत विश्वासराव यांच्या वाढत्या मतांमुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याची चिन्हे आहेत. विक्रम काळे, सूर्यकांत विश्वासराव आणि किरण पाटील या तिन्ही उमेदवारांमध्ये फार अंतर नसल्याचे सांगण्यात येत आहे. कधी विश्वासराव आघाडी घेत आहेत तर कधी विक्रम काळे आणि पाटील. त्यामुळे कोणाला किती मते पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वाचा सविस्तर
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात सुरुवातीचे कल धक्कादायक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे व भाजप उमेदवार किरण काळे हे दोन्ही तुल्यबळ उमेदवारांइतकेच मते मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना मिळत होते. त्यानंतर मात्र, विक्रम काळे यांनी आघाडी मिळवली आहे. राष्ट्रवादीचे विक्रम काळे सध्या 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
कोकण शिक्षक मतदारसंघात पहिल्या टप्प्यात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे 2 हजार मतांनी आघाडीवर होते. त्यांना 7 हजार मते मिळाली. तर, त्यांच्याविरोधात उभे असलेले शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना 5 हजार मते मिळाली.
अमरावती पदवीधर मतदारसंघाची पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात 192 मते वैध ठरली आहेत. तर, स्वयंघोषणा पत्र न लावल्याने 73 मते अवैध ठरली आहेत. सर्वाधिक अकोला जिल्ह्यातील 34 मते अवैध ठरली आहेत. टपाली मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर आता पाहिल्या फेरीला सुरवात झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे 88 मतांनी पुढे आहेत.
औरंगाबादेत मतमोजणीला सुरवात झाली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने , मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , जिल्हा निवडणूक अधिकारी, उमेदवार आणि उमेवारांचे प्रतिनिधी मतमोजमी केंद्रांवर उपस्थित आहेत. 56 टेबलांवर ही मतमोजणी होत आहे. वाचा सविस्तर
नाशिकमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 48 पोस्टल मतं वैध ठरली आहेत. तर, 12 मतं अवैध ठरली आहेत.
निकालाआधीच पुण्यात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पोस्टर लागले आहेत.
मतमोजणी दोन टप्प्यांत होणार आहे. दुपारपर्यंत अवैध मत व वैध मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल.
अमरावती पदवीधर मतदार संघाची मतमोजणी बडनेरा रोडवरील नेमानी गोडाऊनमध्ये सुरू आहे.
या लढतींकडे राज्याचे लक्ष
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील, अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत नागोराव गाणार व सुधाकर आडबाले, तर कोकण शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे.
औरंगाबादेत 14 उमेदवार रिंगणात
औरंगाबादेत चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे मतमोजणी सुरू झाली आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केल्याने विक्रम काळे यांची डोकेदुखी वाढली. यानंतर सोळुंके यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली. सोळुंके व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. औरंगाबाद मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत.
मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मतमोजणी केंद्रावर उपस्थित आहेत.
नाशिक : सत्यजित तांबे- शुभांगी पाटील यांच्यात चुरस
नाशिकमध्ये सत्यजित तांबे व भाजप बंडखोर शुभांगी पाटील यांच्यात खरी चुरस आहे. शुभांगी पाटील यांना ऐनवेळी भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंड केले. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला असून भाजपने छुपा पाठिंबा दिला आहे, तर शुभांगी पाटील यांना ठाकरे गटासोबतच महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केल्याने सामना चुरशीचा होईल.
नागपूर : ना.गो. गाणार - आडबोले
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे ना. गो. गाणार व विदर्भ शिक्षक संघाचे सुधाकर आडबोले यांच्यात चुरस आहे. ठाकरे गटाचे गंगाधर झाडे यांना ऐनवेळी माघार घेण्यास सांगण्यात आले होते. गंगाधार झाडे यांच्या माघारीमुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुधाकर आडबोले यांची अडचण होऊ शकते. नागपूर शिक्षक मतदारसंघात एकूण 22 जण रिंगणात आहेत.
अमरावती : भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी लढत
अमरावतीमध्ये भाजपचे डाॅ.रणजित पाटील, काँग्रेसचे धीरज लिंगाडे व वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकर यांच्यात तिरंगी लढत आहे. अकोला व अमरावतीमध्ये वर्चस्व असलेल्या वंचितच्या उमेदवारांनी मते खेचल्यास काँग्रेसला फटका बसू शकतो. इथे 23 उमदेवार आहेत.
कोकणात पाटील-म्हात्रे आमने-सामने
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे व मविआ पुरस्कृत शेकाप उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्यात चुरस आहे. जदयूचे धनाजी पाटील यांच्यासह एकूण 8 उमेदवार रिंगणात आहेत. धनाजी पाटील यांची मते कुणाचे नुकसान करतात त्यावर निकाल अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.