आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या एकूण उत्पन्नातील २ टक्के वाटा उचणाऱ्या महिला उद्योजकांत महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे १०० पैकी २६ उद्योजिका असल्याचे पुढे आले आहे. जगभरातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करणाऱ्या "हुरून इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या "लिडिंग वेल्दी वुमन २०२१' यादीत देशातील पहिल्या १०० श्रीमंत महिलांची नावे आहेत. त्यात मुंबईतील १२, पुण्यातील ५ उद्योजिका असून त्यांंची एकूण संपत्ती १,२४,४८० कोटींच्या घरात आहे. महिला सक्षमीकरणासाठी आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात यामुळे आणखी एक अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे.
शिक्षणात आघाडीवर असलेल्या स्त्रियांचा टक्का नोकरी-व्यवसायात अल्प असल्याची चिंता नेहमी व्यक्त केली जाते. एकूण आर्थिक व्यवहारातील हे तुलनात्मक प्रमाण कमी असले तरी त्याचा आलेख उंचावत चालला आहे. देशातील श्रीमंत महिला उद्योजकांची यादी कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल २६ महिलांनी मानाचे स्थान पटकावले आहे.
दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीतील (२०), तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूतील (११) तर चौथ्या क्रमांकावर तेलंगणातील (१०) उद्योजिकांचा समावेश आहे.
देशातील “लिडिंग वेल्थी वुमन’ लिस्टमध्ये नोकरी सोडून २०१२ मध्ये “नायका’ या सौंदर्य प्रसाधन उत्पादनांची स्वत:ची कंपनी स्थापन करणाऱ्या मुंबईच्या फाल्गुनी नायर यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती ५७,५२० कोटींच्या घरात आहे. त्यानंतर लीना तिवारी, अनु आगा, अमीरा शाह, नायरिका होळकर, अनिता जालन, सुप्रिया बडवे आदी महाराष्ट्रीय उद्योजिकांनी आपल्या कर्तृत्वाची श्रीमंत सिद्ध केली आहे.
सेल्फ मेड वुमन नेहा नारखडे : ३८ वर्षांच्या नेहाचा जन्म आणि शिक्षण पुण्याचा. सॉफ्टवेअर इंंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यावर २००६ मध्ये त्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले. लिंक्डइन या कंपनीत चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून काही काळ काम केल्यावर तिने क्लाउड ही स्वत:ची कंपनी भागीदारीत स्थापन केली. २०१७ मध्ये तिची नोंद अमेरिकेतील टॉप ५० महिला उद्योजिकांमध्ये झाली. २०२० साली फोर्ब्ज मासिकात अमेरिकेतील सेल्फ मेड वुमन म्हणून तिने ३३ वा क्रमांक पटकावला. सध्या तिची संपत्ती १३,३८० कोटींच्या घरात गेली आहे. या अहवालानुसार देशातील १० श्रीमंत महिलांमध्ये ती ८ व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील महिलांची यादी
11. स्मिता देवरा लीड स्कूल १,३९० कोटी
12. हेतल गाला आरती उद्योग १,३७० कोटी
13. बिना शाह सिग्नेट केमिकल्स १,१८० कोटी
14. तारिणी जिंदाल हंडा जिंदाल एनर्जी १११० कोटी
15. माला वजिराणी ट्रान्साशिया बायो मेडीकल्स ८८० कोटी
16. नमिता थापर एमक्युअर फार्मास्युटिकल्स ८३० कोटी
17. अनुराधा देसाई वेंकीज इंडिया ७८० कोटी
18. शारदा बुबना शारदा क्रॉपकेम ५५० कोटी
19. वर्षा तैराणी टीप्स इंडस्ट्रीज ४६० कोटी
20. आएशा मलिक मेट्रो शूज ४६० कोटी
21. फराह मलिक मेट्रो शूज ४६० कोटी
22. आदिती देसाई डीएसपी इन्व्हेस्टमेंट मँनेजर ४३० कोटी
23. आदिती पनांडीकर इंडिगो रेमेडीज ३७० कोटी
24. मधुरिमा सिंग अल्केम लँबोरेटरीज ३६० कोटी
25. शांती एकंभरम कोटक महिंद्रा ३२० कोटी
26. विद्या शाह एडलवेल फायनान्शिअल सर्व्हि ३०० कोटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.