आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात हा आठवडा राहणार पावसाचा:कोकण-विदर्भात जोरदार; मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात होईल मध्यम पाऊस

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अमरावतीसाठी यलो अलर्ट

गेल्या आठवड्यात राज्यभर सर्वदूर धुवाधार बरसलेल्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली. आता १२ सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा आस, मध्य भारतावर असलेले परस्परविरोधी वाऱ्यांचे प्रवाह यामुळे राज्यात दि. १२ ते १५ सप्टेंबर या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अमरावतीसाठी यलो अलर्ट : कुलाबा वेधशाळेनुसार रविवार ते बुधवारपर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. दि. १२ सप्टेंबर : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांसाठी मध्यम ते जोरदार पावसाचा यलो अलर्ट. इतर जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट. दि. १३ सप्टेंबर : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर पालघर, ठाणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट. दि. १४ सप्टेंबर : रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर. पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट. तर औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट. दि. १५ सप्टेंबर : पुणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट. तर ठाणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी यलो अलर्ट.

बातम्या आणखी आहेत...