आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेरोना साहित्य:मास्क, पीपीई किट, औषधी, व्हेंटिलेटर मिळवण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर, राज्याला 11.88 लाख पीपीई किट

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • केंद्राच्या मदतीचा महाराष्ट्र सर्वात मोठा लाभार्थी

काेरोनाच्या संकटापासून लढण्यासाठी केंद्र सरकार देशभरात आवश्यक आयुधे पुरवत असून त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक व्हेंटिलेटर, मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर आणि आैषधी आली आहे. भाजपशी काडीमोेड घेत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. मात्र, यामुळे केंद्राकडून मदतीचा ओघ मिळण्यात अडसर आला नसल्याचे यातून स्पष्ट होते.

मार्चमध्ये कोरोनाचे संकट सुरू झाल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची, तर रुग्णसेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांकडे पीपीई किट, मास्क आणि औैषधीचीही कमतरता भासली. केंद्र सरकारने राज्यांना या साहित्याचा पुरवठा सुरू केला. आठ ऑगस्टपर्यंत केंद्राकडून देशभरातील रुग्णालयात २.६३ कोटी एन-९५ मास्क, १.१९ काेटी पीपीई किट, १०.८३ हायड्रोक्सीक्लोरोक्विन टॅबलेट आणि १५२८७ व्हेंटिलेटर पाठवले आहेत. ही मदत मिळवण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ही माहिती उपलब्ध झाली.

राज्याला ११.८८ लाख पीपीई किट
महाराष्ट्राला आतापर्यंत केंद्राकडून २४.४६ लाख एन-९५ मास्क, ११.८८ लाख पीपीई किट, तर ९७.२ लाख एचसीक्यू टॅबलेट्स मिळाल्या आहेत. राज्यासाठी ४०४७ व्हेंटिलेटर मंजूर झाले असून त्यापैकी ३४६३ प्रत्यक्षात मिळाले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ १५ लाखांहून अधिक मास्क मिळवणाऱ्या राज्यात गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीला ७ लाखांहून अधिक पीपीई किट मिळाले आहेत. एचसीक्यू टॅबलेट्स मिळवण्यात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार आणि राजस्थानचा क्रमांक लागतो.

बातम्या आणखी आहेत...