आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:मुसळधार पावसामुळे नांदेडमध्ये पूरस्थिती; मुलगा वाहून गेला, दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड : गोकुळनगर परिसरात धुवाधार पाऊस झाल्यानंतर वाहने अशी पाण्याखाली गेली होती.छाया : करणसिंह बैस. - Divya Marathi
नांदेड : गोकुळनगर परिसरात धुवाधार पाऊस झाल्यानंतर वाहने अशी पाण्याखाली गेली होती.छाया : करणसिंह बैस.

मागील काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस मराठवाड्यात ठिकठिकाणी बरसण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी नांदेड शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मुखेड तालुक्यात कापरवाडी येथे साईनाथ प्रमोद लांडगे (८ ) हा नाल्यात वाहून गेला. तर, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कंधार व माहूर तालुक्यात घडली. दरम्यान, नांदेड शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, कंधार तालुक्यात गणातांडा येथील रविवारी वीज पडून दिनेश केशव पवार (२७) यांचा तर माहूर तालुक्यातील अंजनी येथील शेतकरी आकाश भीमराव कुरसंगे ( २७) यांच्या वीज पडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. परभणी शहरात जोरदार तर मानवत, पाथरी, जिंतूर, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्हयात शनिवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काही भागात ओढे व नाल्यांना काही प्रमाणात पाणी आले आहे. जिल्ह्यात सरासरी १३ टक्के पाऊस झाला आहे. उस्मानाबाद शहरासह परंडा, भूम, वाशी, लाेहारा, उमरगा तालुक्यातील काही भागात सायंकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

बातम्या आणखी आहेत...