आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंचकुला (हरियाणा) येथे सुरू असलेल्या चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. देशात महाराष्ट्राचा डंका वाजवला जातो आहे. गुरुवारी 9 जून रोजी सकाळच्या सत्रात आर्यन कदम व सुदेशना शिवनकरसह महिला रिले संघाने सुवर्णपदक जिंकले.
अशी मारली बाजी?
अॅथलेटिक्समध्ये 200 मीटर शर्यतीत आर्यन कदमने ओरिसाच्या आर्यन एक्काला 72 सेकंदाच्या फरकाने पराभूत केले. कदमने 21.82 सेकंदात सुवर्ण आणि एक्काने 22.10 सेकंदात रौप्यपदक पटकावले. तेलंगणाच्या अंकित चौधरीला 22.27 सेकंदात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या 200 मीटर शर्यतीत सुदेशना हनुमंत शिवनकरने आपलीच महाराष्ट्राची सहकारी अवंतिका संतोष नराळेला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. सुदेशनाने 24.29 सेकंदात प्रथम आणि अवंतिकाने 24.75 सेकंदात दुसरा क्रमांक पटकावला. तेलंगणाची मायावती नाकिरेकांती 24.94 सेकंदात तिसऱ्या स्थानी राहिली.
अनन्याचे दुहेरी यश
जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या अनन्या बालाने उत्कृष्ट कामगिरी करत 2 रौप्यपदके जिंकत दुहेरी यश मिळवले आहे. तसेच आर्यन वार्नेकरने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
महिला 200 मीटर फ्री स्टाइल
हसिका रामचंद्र, कर्नाटक (2.07.84), अनन्या बाला, महाराष्ट्र (2.09.79), आस्था चौकशी, आसाम (2.11.05)
महिला 800 मीटर फ्री स्टाइल
वृती अग्रवाल, तेलंगणा (9.24.33), अनन्या बाला, महाराष्ट्र (9.25.39), शिरीन, कर्नाटक (9.26.62)
पुरुष 50 मीटर बटरफ्लाय
हर्ष सहोरा, हरियाणा (25.22 सेकंद), बिक्रम चंगमाई, आसाम (25.23 सेकंद), आर्यन वार्नेकर, महाराष्ट्र (25.46 सेकंद)
रिले संघाची सुर्वण धाव
अॅथलेटिक्सच्या 4 बाय 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या महिला संघाने सुवर्णपदक पटकावले. विजेत्या संघात शिवेच्छा पाटील, प्रणाली पाटील, रिया पाटील आणि वैष्णवी कातुरे यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.