आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:आशियाई खो-खो ​​​​​​​स्पर्धेतील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा गिरीश महाजन, अजित पवार यांच्याकडून सत्कार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच तामूलपूर, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, गुवाहाटी (आसाम) येथे संपन्न झालेल्या चौथ्या आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मिळवत देशातील खेळाडूंनी भारताचे नाव उज्ज्वल केले. मुंबई येथे आशियाई खो-खो स्पर्धेत भारतीय संघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन व विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यता आला.

राष्ट्रीय संघात आंतराष्ट्रीय खेळाडू अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, सुयश गरगटे आणि अपेक्षा सुतार, प्रियांका इंगळे, गौरी शिंदे, निकिता पवार यांचा समावेश होता. त्याचबराेबर संघ प्रशिक्षक महेश पलांडे, डॉ. अमित रावेट यांचा देखील गौरव करण्यात आला. या वेळी भारतीय खो-खो महासंघाचे डॉ. चंद्रजित जाधव, अॅड. गोविंद शर्मा, सुरेंद्र विश्वकर्मा, पंकज दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाकी आमच्यावर सोडा- महाजन

यावेळी क्रीडामंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आपल्या खेळाडूंनी देशातच नव्हे तर जगभरातचा महाराष्ट्राचा डंका वाजवा. ऑलिम्पिकमध्येही आपल्याला पदके जिंकून द्यावीत. तुम्ही फक्त जिद्दीने खेळण्याचे काम करा, बाकी सर्वगोष्टी आमच्यावर सोडा. तुम्हाला कुठल्याही गोष्टी कमी पडू दिली जाणार नाही. महाराष्ट्र शासन सदैव तुमच्या पाठिशी राहिल.

खेळाला ऑलिम्पिमध्ये नेण्याचा प्रयत्न- पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विजेतेपदाबद्दल खेळाडूंचे गोड कौतुक केले. संघटना म्हणून खेळाडूंना नेहमी मदतीचा आम्ही हात देतो. आपल्या देशी खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. आशियात भारत नंबर बनला आहे, जगभरातही नंबर वनच बनेल, असा विश्वास वाटतो. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळाले. पुढेही मिळत राहिल.