आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मान्सून:राज्यामध्ये आठवडाभरात पावसाचा जोर ओसरणार, 10 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी वृष्टी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भातील जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर या आठवड्यात ओसरण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, या आठवड्यात उत्तर व दक्षिण महाराष्ट्र, विदर्भात हलका तर मराठवाडा, मध्य विदर्भ आणि कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. राज्यातील १० जिल्ह्यांत आजपर्यंतच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी सरकला आहे. त्यामुळे मध्य भारतात पावसाचे प्रमाण काहीसे घटण्याची शक्यता आहे.

नाशिक, जळगाव, सोलापूर, नगरमध्ये उघडीप शक्य
हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात नाशिक, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, नगर या जिल्ह्यांत काही दिवस उघडीप होईल.मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस
राज्यात एक जून ते २० जुलैअखेर झालेल्या पावसानुसार, राज्यातील १० जिल्ह्यांत पावसाने अद्याप सरासरी ओलांडलेली नाही. अकोला, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, सातारा, नंदुरबार, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत पावसाची तूट आहे.

0