आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडिजिटल पेमेंट करताय..? मग अतिशय सजग होऊनच असे व्यवहार करा. कारण मागील तीन वर्षांत फसवणुकीच्या ८ लाख २५,२७३ तक्रारी आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लोकायुक्तांकडे प्राप्त या तक्रारींत १८९.४६ कोटींना गंडा घातल्याचे नमूद आहे. डेबिट, क्रेडिट कार्ड आणि यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहारात २५ ते ४० वयोगटातील फसणाऱ्यांचे प्रमाण ५४ टक्के आहे, तर ४२ टक्के नोकरदार आणि १० टक्के गृहिणींनाही फटका बसला आहे.
देशात सर्वाधिक फसवणूक दिल्लीच्या नागरिकांची झाली. एकूण ८ कोटी ७६ लाख ८,७१३ रुपयांना गंडा घातला. त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात ७ कोटी २५ लाख ५१,६७६ रुपयांची फसवणूक झाली.डिजिटल व्यवहारांत मागील ३ ते ४ वर्षांत प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड आणि इतर साधनांचा वापर २०१८-१९ मधील ३८% च्या तुलनेत २०२०-२१ पर्यंत दुपटीने म्हणजेच ७३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
२५ ते ४० वयोगटातील ५४%, ४२% नोकरदार, तर १०% गृहिणींच्या फॉल्स पेमेंटच्या तक्रारी 1. सन 2018-19 : २ लाख २०८३ जणांनी तक्रारी केल्या, ६३.५५ कोटींचे नुकसान झाले. एका तक्रारीमागे सरासरी ३,१४५ रुपये फसवणूक झाली. 2. सन 2019-20 : सर्वाधिक ३ लाख २०,६९९ तक्रारी आल्या. एकूण ७७.३६ कोटींची फसवणूक झाली. एका तक्रारीमागे सरासरी २,४१२ रुपयांची फसवणूक झाली.
3. सन 2020-21 : ३ लाख २,४९१ तक्रारींत ४८.५५ कोटींची फसवणूक झाली. एका तक्रारीमागे सरासरी १,६०५ रुपयांची फसवणूक झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.