आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात सरकारच्या विविध विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तब्बल 2 लाख 44 हजार पदे रिक्त असल्याची आकडेवारी एका माहिती अधिकारात उघड झाली. मे 2022 ची ही आकडेवारी असून प्रत्यक्षात नोकर भरतीत काटकसर चालू आहे. पण महत्वाचे उद्योग महाराष्ट्रातून गेले पर्यायाने रोजगारही गेले. नेमके हेच अपयश झाकण्यासाठी विद्यमान सरकार नोकर भरतीची नियुक्तीपत्रे जाहीर कार्यक्रम, समारंभ घेऊन देत असून हे दिखाऊपणाचे लक्षण असून सरकारचे दावे पोकळ असल्याची टीका होत आहे.
रोजगाराची स्वप्ने घेऊन वाटचाल करणाऱ्या तरुणांना पदभरतीची आशा आहे. परंतु पोलिस आणि तलाठी भरतीशिवाय कोणतीही भरती फारशी मोठी होत नसल्याची स्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. मेगा नोकरभरतीची वाट पाहत काही पिढ्यांची वयोमर्यादाही संपत आली परंतु सर्वकष क्षेत्रातील मेगा पदभरती अजूनही ग्रहणातच आहे. त्यामुळे बेरोजगारीचे ग्रहण कधी सुटणार हाच यक्षप्रश्न आज सतावत आहे.
गृहविभागात सर्वात जास्त रिक्त पदे
गृह विभागात सर्वात अधिक रिक्त पदे असल्याचे दिसते. विविध शासकीय विभागांत अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे त्याचा अतिरिक्त कामाचा ताण अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पडतो. ठाकरे सरकारने सत्तेच्या अखेरच्या काही दिवसांत जीआर काढून मेगा पोलिस भरती होणार असल्याचे जाहीर करुन दिलासा दिला होता. त्यानंतर आलेल्या शिंदे - फडणवीस सरकारनेही पोलिसांची मोठी भरती होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या विभागाला मनुष्य'बळ' मिळण्याची आशा आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुठे किती रिक्त पदे?
राज्य सरकारच्या प्रशासनातील एकूण 29 शासकीय विभाग जिल्हा परिषद आस्थापनात मंजूर पदांची संख्या 10 लाख 70 हजार 840 इतकी. यापैकी आठ लाख 26 हजार 435 पदे भरलेली आहेत. तर दोन लाख 44 हजार 405 पदे रिक्त आहेत.
23 टक्के जागा रिक्त
मे 2022 रोजी एका माहिती अधिकारातून मागवण्यात आलेल्या प्रश्नांवर सामान्य प्रशासन विभागाने उत्तर दिले आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात 14 विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने 14 विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी भरती होणार आहे. या संदर्भातील जाहिरात जानेवारी 2023 मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल.
विद्यमान सरकारचे अपयश - विजय चोरमारे
रोजगार निर्मिती आणि सरकारचे धोरण यावर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, रोजगार ही सतत अद्यावत प्रक्रीया असून ती अद्यावत ठेवावीच लागते. महाराष्ट्रातून जे प्रकल्प गेले, त्यामुळे लाखांच्या पटीत रोजगारही गेले ही वस्तूस्थिती आहे. यात विद्यमान सरकारचे अपयश आहे. राजकीय आरोपांपलीकडे जाऊनही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही.
आत्ताच मुल्यमापन करता येणार नाही
विजय चोरमारे म्हणाले, एकूण किती प्रमाणात रोजगार निर्माण करतात यावर आत्ताच लगेच त्याचे मुल्यमापन करता येत नाही. कारण किमान एक वर्ष तरी जाऊ द्यावे लागेल. आर्थिक वर्ष समोर ठेवून सरकारकडून रोजगार निर्मितीबाबत मुल्यमापन करणे उचित ठरते. वर्षभरात सामान्यत किती रोजगार उपलब्ध होतात आणि विद्यमान सरकार किती करते. यानंतर सरकारच्या याबाबतीतील कामगिरीवर ठोस ठरवता येते.
विद्यमान सरकारचे दावे पोकळ
विजय चोरमारे म्हणाले, प्रकल्प व त्यातून रोजगाराबाबत आता जे दावे विद्यमान सरकार करीत आहेत ते प्रकल्प येतील, काम सुरू होऊन रोजगार निर्मिती होईल. त्यावेळी आपल्याला मुल्यमापन करता येणार आहे. आताचे दावे फक्त राजकीय आहे. जे प्रकल्प बाहेर गेले त्यावर मुलामा लावण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत.
अलीकडे झालेल्या पदभरतीच्या घोषणा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.