आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात स्की अँड स्नो मंडळाच्या नियुक्त्या:राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी आनंद लाहोटी यांची निवड, सचिवपदी प्रदीप राठोड

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य संघटनेची स्की अँड स्नो मंडळाची सर्वसाधारण सभा पुण्यात उत्साहात पार पडली. या सभेत 2023 ते 2027 या कालावधीसाठी नव्या कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. कोरेगाव पार्क येथील वेस्टिन हॉटेल येथे या नियुक्त्या झाल्या. महाराष्ट्र राज्य संघटनेची स्की अँड स्नो मंडळाच्या अध्यक्षपदी पुण्याचे अॅड. आनंद लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सचिवपदी प्रदीप राठोड यांची नेमणूक झाली आहे. ही निवड बिनविरोध झाली.

नियुक्ती बैठकीत निवडणुक अधिकारी म्हणून अॅड. सुधीर महाले यांनी कामकाज पाहिले. त्याचबरोबर निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव दयानंद कुमार यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित सदस्यांचे संघटनेच्या माजी अध्यक्ष फिरोजा शेख, माजी सचिव साबीर शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरवण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी गणेश बेटुदे, सतीश पोद्दार, प्रियंका मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथमच संधी

स्की स्की अँड स्नो बोर्ड महाराष्ट्र राज्य संघटनेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एकाच वेळी दोन क्रीडा संघटकांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे. ते दोघे मराठवाड्याचे प्रतिनिधीत्व करतील.

नवे सदस्य दीपक रुईकर म्हणाले की, ‘हा खेळ मराठवाड्यासाठी नवीन आहे. आता आमच्यावर जबाबदारी देण्यात आल्याने त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.. विदेशात प्रचंड लोकप्रिय असलेला हा खेळ आहे. आम्ही सुरूवातीला आमच्या खेळाडूंना बाहेरील राज्यात घेऊन जात तेथे सराव करणार आहोत. बेसिक गोष्टी त्यांना माहिती करुन देऊ. संघटनेच्या माध्यमातून नियोजित आराखडा तयार करुन खेळाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत.’

नुतन कार्यकारिणी

अॅड. आनंद लाहोटी (अध्यक्ष), प्रदीप राठोड (सचिव), विनिता राठोड (कोशाध्यक्ष), कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रदीप खांडरे, जयेश राठोड, नेहा राठोड, दीपक रुईकर.

बातम्या आणखी आहेत...