आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी निकाल:निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटीची होणार चौकशी, महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आदेश

औरंगाबाद17 दिवसांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे 16 जुलैला दहावीचा निकाल दुपारी एक वाजता घोषित करण्यात आला. परंतू, दुपारी एक वाजेनंतर संकेतस्थळावर तांत्रिक अडचणीमुळे निकाल पाहण्यात अडचणी येत होत्या. राज्य मंडळामार्फत दहावीचा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटीसंदर्भात शासनाने चौकशी समिती गठीत केली आहे.

निकालापुर्वी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष यांनी संबंधितांसोबत बैठक आयोजित केली होती का? निकाल घोषित करण्यासंदर्भात मंडळातील संबंधित तांत्रिक सल्लागारांना पुर्वसूचना दिली होती का? संकेतस्थळाची देखभाल करण्याऱ्या कंपनीला निकाल घोषित करण्याबाबत पुर्वसूचना दिली होती का? दहावीला प्रविष्ठ असलेल्या मुलांची संख्या मोठी असल्यामुळे निकाल घोषित करण्याच्या अनुषंगाने संकेतस्थळाची पुर्व तपासणी केली होती का? निकालासाठी क्षमतेच्या सर्व्हरचा वापर केला होता का? याबाबत समितीने सखोल चौकशी करुन तपासणी अहवाल १५ दिवसांत शासनाला सादर करावा, असे आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...