आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात कोरोना कहर:औरंगाबादेत 902 रुग्ण, 9 मृत्यू; 3 दिवसांत संख्या 2 हजारने वाढली; राज्यात 30 दिवसांत 5 पटींनी नवे रुग्ण वाढले

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात एका दिवसात ५५० एवढी सर्वाेच्च रुग्णसंख्या ९ मार्च राेजी नाेंदली गेली हाेती. दाेनच दिवसांत ११ मार्च राेजी त्यापेक्षा दीड पटीने अधिक म्हणजे तब्बल ९०२ नवे काेराेनाबाधित सापडले. यात शहरातील ६७९ व ग्रामीण भागातील २२३ जणांचा समावेश आहे. शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही झपाट्याने संसर्ग वाढत असल्याचे यावरून दिसून येते.

१० मार्च राेजी ५३२ नवे रुग्ण सापडले हाेते. २४ तासांत त्यात ३७० ने वाढ झाली. झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणेसमाेरील चिंता वाढली आहे. यापैकी ५५० रुग्ण घाटी व जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ५५,३४२, तर बळींचा आकडा १३२० वर गेला आहे. गुरुवारी दिवसभरात शहरातील २३१, तर ग्रामीण भागातील ४६ अशा एकूण २७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण ४९,८९० जण आतापर्यंत काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या ४१३१ जणांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी दिवसभरात उपचार घेणाऱ्या नऊ जणांचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांत २४ काेराेनाबाधितांचा मृत्यू झाला.

लॉकडाऊन रिटर्न्स : मास्क-िडस्टन्सिंगच इलाज
- महाराष्ट्रात गुरुवारी सर्वाधिक १४,३१७ नवे रुग्ण आढळले आहेत. हा यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. राज्यात 30 दिवसांत 5 पटींनी नवे रुग्ण वाढले.
- देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या १० जिल्ह्यांपैकी तब्बल ८ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. १ जिल्हा केरळ व १ कर्नाटकचा आहे. महाराष्ट्रात सक्रिय रुग्ण १ लाख आहेत.

निवडक जिल्ह्यांतील परिस्थिती
औरंगाबाद-नाशिक : शनिवार-रविवार पूर्णपणे कडकडीत लॉकडाऊन सुरू राहणार आहे.
बुलडाणा : ४ फेब्रु. ते १६ मार्चपर्यंत रात्री कर्फ्यू
अकोला, यवतमाळ : सकाळी ६ पर्यंत कर्फ्यू
जळगाव : २२ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू

धुळे : रविवारपासून लॉकडाऊनचे संकेत.
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जे.जे. रुग्णालयामध्ये ‘कोव्हॅक्सिन’ ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही लस घेतली. या वेळी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

नागपुरात लॉकडाऊन, इतरत्र निर्बंध शक्य : उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी नागपुरात १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाइलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल. राज्यात गुरुवारी १४,३१७ नवे रुग्ण आढळले होते. ही यंदाच्या वर्षातील सर्वाधिक वाढ आहे. यापूर्वी ८ ऑक्टोबर २०२० ला १३,३९५, तर बुधवारी १३,६५९ रुग्ण आढळले होते. दुसरीकडे, देशात सुमारे अडीच महिन्यांनंतर एका दिवसात सर्वाधिक २२,८५४ नवे रुग्ण सापडले. एकाच दिवसात ५ हजार रुग्ण वाढले आहेत. रोज आढळणाऱ्या रुग्णांत महाराष्ट्राचा वाटा ६९%, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात व तामिळनाडूचा वाटा २५.९१% आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या २२ लाख ६६,३७४ वर पोहोचली आहे. मृतांचा आकडाही ५२६६७ झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.९४ टक्क्यांवर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...