आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी जाहीर:महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेची कार्यकारिणी जाहीर ; व्यवस्थापन सदस्यपदी बालाजी पवार यांची निवड

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेच्या मराठवाडा विभागाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. नांदेड येथील गुरुद्वारामधील पंजाब भवनात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीत व्यवस्थापन सदस्यपदी बालाजी पवार यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अण्णासाहेब जगताप, संघटन सचिवपदी लातूरचे जगदीश उमरदंड यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून मालेगावचे रवींद्र कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली. या वेळी अंबादास खेडकर, गणेश वाडकर आदींची उपस्थिती होती. नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...