आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इशारा:महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांचा लेखणीबंद व परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीनशिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यापीठीय सेवक सयुंक्त कृती समीती यांच्या वतीने सातवा वेतन आयोगाच्या व इत्तर मागण्यांच्या संदर्भात वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदय,संचालक, व सहसंचालक उच्च शिक्षण विभाग यांना आजतागायत लेखी निवेदन दिलेले आहे.परंतु अद्यापपर्यंत फक्त आश्वासन मिळत राहिलेले आहे.

कर्मचारी वृन्दांच्या कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत.तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे अश्या कर्मचारी वृन्दानावर उपासमारीची वेळ येत आहे.तसेच आश्वाशित प्रगती योजना लागू करनेकामी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.यामुळे महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीनशिक्षकेत्तर कर्मचारी वृन्दाना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत.आज महाराष्ट्रामध्ये सर्व कर्मचारी वर्गाला सातव्या आयोगाचा लाभ मिळालेला आहे.फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीनशिक्षकेत्तर कर्मचारी वर्गच या लाभापासून वंचित आहे.तरी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीनशिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीनशिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग लेखणी/अवजार बंद सह ठिया आंदोलन व दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२० पासून विद्यापीठीय परीक्षेवर महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीनशिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग बहिष्कार घालील याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील.असा इशारा महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीनशिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष गणेश तांदळे,उपाध्यक्ष नितीन काकडे कार्याध्यक्ष सतीश माहोरे महासंघाचे सल्लागार रामनाथ बोबडे जिल्हा अध्यक्ष किरण साळुंके यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...