आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्नीत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी बीडच्या डॉ. अविनाश बारगजे यांची, तर महासचिवपदी मिलिंद पठारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. औरंगाबादच्या निरज बोरसे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली.
औरंगाबादेत झालेल्या सर्वसाधारण सभेत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक ॲड. राजकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) व औरंगाबाद खंडपीठाचे वकील तथा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विजय ढाकणे यांच्या निरिक्षणाखाली सन 2023 ते 2027 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. नवी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक पार पडल्यानंतर राज्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडली.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
उपाध्यक्ष- विनायक गायकवाड (मुंबई उपनगर) व धुलीचंद मेश्राम (गोंदिया), सचिव सुभाष पाटील (रायगड), खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा (रत्नागिरी), नीरज बोरसे (औरंगाबाद), अजित घारगे (जळगाव) व सतिश खेमसकर (चंद्रपूर) यांची कार्यकारी सदस्यपदी निवड झाली आहे. दोन वेळा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी राहिलेले प्रविण बोरसे व सुशांत भोयार यांच्यावर अतिरिक्त उपाध्यक्षपदाची जबाबदारी राज्य कार्यकारिणी मंडळाने दिली आहे. तसेच विविध समिती अंतर्गत वृषाली पाटील (नांदेड), राजेश महाजन (उस्मानाबाद) व भालचंद्र कुलकर्णी (सिंधुदुर्ग) यांची उपाध्यक्षपदी, तर लेखा चेत्री (यवतमाळ), कौशिक गरवालीया (ठाणे), विनायक ऐनापुरे (सांगली) यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे.
खेळाडूंना सुविधा देवू
अधिकृत राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना प्रवास, भोजन, किटसह अवश्यक सर्व सुविधा राज्य संघटनेकडून पुरवण्यात येतील. अशा गुणवंत खेळाडूंवर कुठलाही आर्थिक भार पडू देणार नाहीत. खेळातील सुविधा वाढवणे व खेळाडूंची गुणवत्ता वाढीसाठी प्रथम प्राधान्य देऊन भविष्यातही काम सुरू राहील, अशी प्रतिक्रिया नव नियुक्त अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली.
सर्व खेळाडूंना संधी देणार
राज्यातील अधिकृत स्पर्धांपासून वंचित रहात असलेल्या खेळाडूंबाबत सकारात्मक विचार करून टी. एफ.आय. च्या मार्गदर्शनाखाली अधिकृत स्पर्धेसाठी दरवाजे खुले करू. खेळ वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील. तायक्वांदो खेळात महाराष्ट्र राज्य देशपातळीवर प्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास महासचिव मिलिंद पठारे यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.