आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृतसर (पंजाब) येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या अभय शिंदे आणि सांगलीच्या गिरीश जाकातेने रौप्यपदक पटकावले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इप्पी संघाने कांस्यपदक आपल्या नावे केले. संघात नाशिकचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य दुधारेसह प्रथम कुमार शिंदे, गिरीश जकाते, निखिल कोहड यांचा समावेश आहे. सायबर प्रकारात अंतिम लढतीत अभयला राजस्थानच्या करणसिंगने १५-७ ने हरवले आणि इप्पी प्रकारात अंतिम लढतीत गिरीश जकातेला पंजाबच्या उदयवीर सिंगने १५-८ ने पराभूत केले. औरंगाबाद साईच्या अभय व गिरीशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांना साईचे प्रशिक्षक तुकाराम मेहेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे साईचे उपसंचालक नितीन जैस्वाल, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, डॉ. दिनेश वंजारे आदींनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.