आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
एप्रिलनंतर किमान मे महिन्यात तरी उन्हाळ्याचे उन पडेल, असे वाटले होते. परंतु 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या शुभारंभाला अर्थात 30 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसाही पाऊस होताच. त्यानंतर मंगळवार, 2 मे आणि बुधवार, 3 मे रोजीही सकाळी पावसाने दर्शन दिले. दुपारनंतर पडलेल्या उन्हाने रस्ते कोरडे झाले. परंतु वातावरणातील गारवा कायमच होता.
वीज गुल
काल मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. आणि शहरातील अनेक भागांमध्ये वीज गुल झाली. ती थेट पहाटेपर्यंत आली नाही. मे महिना सुरु होऊनही यंदा अवकाळीमुळे वातावरणात थंडावा कायम आहे. पिकांच्या नुकसानामुळे बळीराजा कोलमडला आहे.
शेतजमिनीचे पोतही बिघडले
सध्या बहुतेक शेतांमध्ये उन्हाळी मूग, भुईमूग, कांदा, हरभरा, गहू, टोमॅटो, मिरची, कोहळे आदी भाजीपाल्यासह संत्रा, मोसंबी, डाळींब, आंबा अशी फळपिके आहेत. या सर्व पिकांना वादळी पावसाचा फटका बसला. काही भागात तर नदी-नाले दुथडी भरून वाहिल्याने शेतजमिनीचे पोतही बिघडले. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले. अगदी पहिल्या दिवशी प्राथमिक अंदाज आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांनी कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांद्वारे अंतिम अहवाल तयार करण्यात आला.
याठिकाणी पावसाचा यलो अलर्ट
कोकणात- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाड्यात- छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.