आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारपासून राज्यातही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सध्याही औरंगाबाद, नागपूर, पुण्याचे तापमान घसरत आहे. आज सोमवारी औरंगाबादचे तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विदर्भातही थंडी कमी-जास्त होत आहे.
अशी वाढणार थंडी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवार आणि गुरुवारी उत्तर भारतात चक्रवाताची शक्यता आहे. या काळात जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजही औरंगाबादचे तापमान घसरल्याचे दिसले. विदर्भासह मराठवाडा आणि पुण्यात पारा घसरत आहे.
आजचे तापमान असे
आज सोमवारी औरंगाबादचे तापमान 10.4 नोंदवले गेले. नांदेड 13.6, सातारा 14, सोलापूर 16.7, जळगाव 10.3, नाशिक 12.5, पुणे 11.5, सांगली 16.9, उदगीर 16, रत्नागिरी 18.5, कोल्हापूर 18.3, मालेगाव 14.2, माथेरान 17.4, उस्मानाबाद 17, परभणी 12.5, ठाणे 21, डहाणू 16.1 आणि बारामती 12.9 नोंदवले गेले.
कधी थंडी तर कधी...
सध्या वातावरण विचित्र झाले आहे. अनेकदा रात्री थंडी असते, दिवसा नसते. तर अनेकदा दिवसा थंडी जाणवते व रात्री गायब होते. तर अनेकदा अक्षरशः घामाच्या धारा बरसत राहतात. हा हवामान बदलाचा फटका असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जगभरात हवामान बदलामुळे कुठे दुष्काळ, कुठे पूर, तर कुठे थंडीच्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. प्रदूषणवाढ थांबली नाही, तर येणाऱ्या काळात असे बदल वारंवार जाणवण्याची भीतीही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.