आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील नेत्यांनी राजकीय अस्तित्वासाठी सीमाप्रश्नाचा वापर करू नये, आपण त्या राज्याला एक इंचही जमीन देणार नसल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात अनेक कन्नड भाषिक भाग असून त्यांचा कर्नाटकमध्ये समावेश करण्याबाबत विचार सुरू आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या लढ्याला पाठिंबा देत राहू, असे सांगितले होते. त्यावर बोम्मई यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचा बेळगावमधील ८०० गावांसाठी लढा
बेळगाव परिसरातील ८०० गावांचा महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती लढा देत आहे. बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचे दाखवण्यासाठी कर्नाटकने सुवर्ण विधानसौधचे बांधकाम केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.