आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा:महाराष्ट्राचा महिला संघ बाद फेरीत दाखल; औरंगाबादची तृप्ती अंधारेची चमदार कामगिरी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने ड गटात दुसरा साखळी विजय नोंदवत 48 व्या कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांची गाठ इ गटातील उपविजेत्या पॉडेचरी संघाशी होईल. यामध्ये औरंगाबादची तृप्ती अंधारेची चमदार कामगिरी पाहायला मिळाली.

पटना-बिहार येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलातील मॅटवर सुरू असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रा संघाने तेलंगणाला 43-18 असे सहज नमवित आपली आगेकूच कायम राखली. सातव्या मिनिटाला पहिला लोण देत महाराष्ट्राने 12-07 अशी आघाडी घेतली. नंतर बोनस गुणांवर भर देत आपली गुणसंख्या वाढवीत नेली. मध्यांतराला 22-08 अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. मध्यांतरानंतर आणखी एक लोण देत 33-12 अशी आपली आघाडी वाढवीत आपला विजय निश्चित केला. शेवटी 25 गुणांच्या फरकाने हा सामना महाराष्ट्राने आपल्या नावे केला.

ज्यूली मिस्किटा हिचा अष्टपैलू खेळ, मनीषा राठोड, औरंगाबादची तृप्ती अंधारे यांच्या झंजावाती चढाया आणि श्रुती सोमासे हिचा भक्कम बचाव त्यामुळे हा विजय एवढ्या मोठ्या फरकाने महाराष्ट्राला मिळविता आला. महाराष्ट्राने या सामन्यात बोनस गुण मिळवण्यावर अधिक भर दिला. मनीषा व तृप्ती यांनी आपल्या चढाईत गुण मिळवण्यापेक्षा बोनस करण्यावर अधिक भर दिला. त्याचा महाराष्ट्राच्या संघाला फायदा झाला.

इतर निकाल संक्षिप्त :-

1) ग गट हिमाचल वि. वि. मध्यप्रदेश 51-27

2) ह गट उत्तर प्रदेश वि. वि. झारखंड 51-05

3) अ गट पंजाब बरोबरी वि. केरळ 34-34

4) ब गट दिल्ली वि वि गुजरात 37-17

5) क गट प.बंगाल वि वि कर्नाटक 31-34

6) ड गट तेलंगणा वि वि ओरिसा 31-31

7) इ गट उत्तरांचल वि वि पॉंडेचरी 49-30

8) फ गट राजस्थान वि वि त्रिपुरा 46-05

9) फ गट छत्तीसगड वि वि आसाम 50-30

10) ग गट मध्य प्रदेश वि वि तामिळनाडू 35-34

11) ग गट हिमाचल वि वि मणिपूर 77-05

बातम्या आणखी आहेत...