आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात येणारे पाच ते सहा िदवस वादळी वारा, गारपिटीसह पूर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय अाहे. ४ ते ८ मे या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर २२ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
गारपिटीची शक्यता : कुलाबा वेधशाळेने ४ ते ७ मे या काळासाठी ४ जिल्ह्यांसाठी ऑरेंज, तर २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
यलो अलर्ट : विदर्भातील ११ जिल्हे, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड,लातूर, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह
२.५ ते ६४ मिमी पावसाची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट : सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह १५ ते ६५ मिमी पावसाची शक्यता. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.