आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार मेळावा:आज विद्यापीठात महारोजगार मेळावा; 15 कंपन्यांचा सहभाग

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेटच्या वतीने “मेगा जॉब फेअर जानेवारी-२०२३’चे शुक्रवारी नाट्यगृहात आयोजन केले आहे. यात १५ कंपन्या सहभागी झाल्या आहेत. औरंगाबाद, पुण्याच्या नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे.

विविध पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता या जॉब फेअरमध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. औरंगाबादच्या एंड्युरन्स टेक्नॉलॉजी, औरंगाबाद ऑटो अन्सिलरी, डयुवोल्स, गोयाम ओटो, गणपती मोल्डिन्स, अलाइड ब्लेंडसे, सुदर्शन सौर, ग्राइंड मास्टर, जस्ट डायल, फ्लिपकार्ट, पगारिया ऑटो, क्वेस कोर्प, सारा मोटर्स, टाइम्स प्रो तसेच इतरही काही कंपन्या सहभागी होतील.

सकाळी ९ः३० पासून नाव नोंदणी सुरू होईल. प्रथम येणाऱ्याची प्राधान्याने मुलाखत घेतली जाईल. यासंदर्भातील कंपन्यांची व रिक्त पदांची सर्व माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवरील ट्रेनिंग व प्लेसमेंटची लिंक देण्यात आली आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. गिरीश काळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...