आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव कोविडच्या परिस्थितीमुळे रद्द करण्यात आला असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नुकतेच काढले आहेत.
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सवा निमित्त मोठी यात्रा भरते. रथोत्सव कार्यक्रम यात्रेतील प्रमुख आकर्षण असून नागनाथ मंदिरात होणाऱ्या या रथोत्सव कार्यक्रमास सुमारे ६० ते ७० हजार भाविकांची उपस्थिती असते. या शिवाय यात्रा महोत्सव काळात नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येतात.
यावर्षी ता. ९ मार्च ते ता. १४ मार्च या कालावधीत यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ता. १० मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता संस्थानचे पदसिध्द अध्यक्ष, सल्लागार, वकील संघाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महापुजेचे आयोजन केले होते. तर ता. ११ मार्च रोजी महाशिवरात्र असून त्यानंतर रविवारी ता. १४ रथोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याबाबत नागनाथ संस्थानकडून नियोजन देखील केले जात होते.
मात्र जिल्हयात कोविड रुग्णांची संख्या मागिल काही दिवसांत पुन्हा वाढली आहे. आता पर्यंत हिंगोली जिल्हयात मंगळवारपर्यंत ता. २२ एकूण कोविड रुग्णांची संख्या ३९५४ असून त्यापैकी ३७५५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जिल्हयात कोविडचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे गर्दी टाळणे, सामजिक अंतर पाळणे आवश्यक झाले आहे. कोविडच्या वाढत्या रुग्णांमुळे यात्रा महोत्सव रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.