आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरस्कार:पन्नालाल सुराणा, संजय आवटे यांना महात्मा फुले पुरस्कार

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे, पन्नालाल सुराणा - Divya Marathi
'दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे, पन्नालाल सुराणा

स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध विचारवंत पन्नालाल सुराणा यांना महात्मा जोतिबा फुले स्मृती जीवनगौरव व “दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांना महात्मा जोतिबा फुले स्मृती संपादक पुरस्कार जाहीर झाला आहे.

विष्णू सगर गुरुजी यांनाही महात्मा जोतिबा फुले स्मृती जीवनगौरव आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रा.किरण सगर यांना महात्मा जोतिबा फुले स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अंबादास पोफळे, अविनाश काळे, अंबादास जाधव यांना महात्मा जोतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्काराने, तर डी.के.शेख यांच्या ‘दंगल आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहास व भाग्यश्री केसकर यांच्या ‘ उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या काव्यसंग्रहास महात्मा फुले स्मृती साहित्य पुरस्काराने गौरवण्यात येईल. पुरस्कार वितरण समारंभ दि. २८ डिसेंबर रोजी रामलिंगप्पा वैरागकर यांच्या स्मृतिदिनी होणार असल्याची माहिती संजय वैरागकर यांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser