आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांचा खासगीकरणाविरोधात एल्गार:अभियंता संघर्ष समिती शिष्टमंडळाचे अमित देशमुख यांना निवेदन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील काही शहरांच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे सोपवण्याच्या हालचाली शासनाकडूनहोत आहेत, हे प्रयत्न थांबवण्यात यावेत अशी मागणी करणारेनिवेदन महावितरण अधिकारी कर्मचारी संघटनेने बाभळगाव येथे माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांना शुक्रवार 16 डिसेंबरला दिले.

यावेळी माजी मंत्री, आमदार देशमुख यांनी महाराष्ट्रातील जनतेचे हीत लक्षात घेता खाजगीकरणाचे सदरील प्रयत्न थांबवण्यासाठी शासनाकडेपाठपुरावा केला जाईल हे आश्वसन या शिष्टमंडळाला आमदारांनी दिले.

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्षसमिती शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत मुंबई परिसरातील, ठाणे महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालीलक्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला चालवायलादेण्यासाठी समांतर परवाना न देण्याबाबत निवेदन दिले. अमित देशमुख यांनी महावितरणच्या वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती शिष्टमंडळाला याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.

​​​​यावेळी राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे, कनिष्ठ अभियंता विष्णू आघाव, कनिष्ठ अभियंता ए. एन. दायमे,​​​​​​​​​​​​​​दासराव बिडगर, एकनाथ जाधव, सुनील कुकर, जी.बी भाडुळे, राहुल भंडारी, सुदर्शन बोळेगावे, राम वाडकर, सचिन गुरवआदी उपस्थित होते.

खाजगीकरण विरोधात एल्गार

​​​​​​​केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने सोप्या पद्धतीने वीज क्षेत्रात खाजगीकरणाचा गाठ घातले जात आहे यामुळे महापारेषण महानिर्मिती महावितरण या तिन्ही वीज कंपन्यातील हीच कामगार अधिकारी तीव्र नाराजी व्यक्त करत आहे तसेच खाजगीकरणाविरोधात त्यांनी एल्गार पुकारला आहे यामध्ये लोकप्रतिनिधींनीही आवाज उठवावा यासाठी 16 डिसेंबर रोजी माजी मंत्री देशमुख यांचे भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...