आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी प्रयोग:महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प जाणून घ्या पु. ल. देशपांडेंच्या पाच व्यक्ती आणि वल्लींकडून

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चतुरस्र लेखक, महाराष्ट्रभूषण पुल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्ली म्हणजे मराठी मुलखाच्या कानाकोपऱ्यात राहणारी सामान्य मराठी माणसंच. या बारा कोटी मराठी माणसांना महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात काय मिळाले अन् सरकार त्यांच्याकडून काय घेणार, हे पुलंच्या पाच व्यक्ती आणि वल्लींकडून जाणून घ्या त्यांच्याच खास शैलीत.

चितळे मास्तर

चितळे मास्तरांनी कधी छडी वापरली नाही. ‘पोरांनो, खरं बोललात तर शिक्षा नाही. उलट चार युक्तीच्या गोष्टी सांगेन हो,’ असा त्यांचा खाक्या. म्हणून जीएसटी दंडातून व्यापाऱ्यांना सवलतीच्या योजना काय आहेत, हे चितळे मास्तरच समजावून सांगतील.

सखाराम गटणे

‘वटवृक्षाच्या शीतल छायेत येणाऱ्या पांथस्थांची वटवृक्षाला काय कल्पना? प्रयास हा प्रतिभेच्या चक्षूंना पुलकित करणारा प्राणवायूच आहे,’ असं अतिक्लिष्ट साहित्यिक बोलणारा सखाराम गटणे. म्हणून मराठी साहित्य, वाङ्मयीन वारसा अशा योजना सांगण्याचा अधिकार सखारामचाच.

हरी तात्या

‘अरे, त्या दिवशी शेलारमामानं उदेभानावर जो काय वार केला म्हणतोस,’ असं सांगणारे हरी तात्या. जणू त्या वेळी ते सिंहगडावरच होते. कोणी काही बोललं की पुरावे द्या, अशी त्यांची गर्जना असे. त्यामुळं गड, किल्ले, स्मारकांसाठीच्या तरतुदींबद्दल हरी तात्यांशिवाय कोण सांगेल?

अंतू बर्वा

‘अहो, गफ्फा हो सगळ्या गफ्फा. घटकाभर धरा की कोंकण रेल्वे गेंलीं पांडू गुरवाच्या परसातून. म्हणून थोंट्या पांडूच्या खांद्याला हाताचे खुंटं फुटणार कां?’ असं कायम तिरकस, खोचक बोलणं. कारण सरकारी घोषणांनी जीवन बदलल्याचं अंतू बर्व्यानं कधी अनुभवलंच नाही. त्यामुळं योजनांच्या चिरफाडीचा मान अंतूचाच.

नारायण

बजेट म्हणजे एक लग्नच. आणि त्यात महिलांच्या सेवेत हरकाम्या नारायण. ‘वत्सलामामी, ऐका. इथल्यापेक्षा द्रौपदी वस्त्र भांडारात खणांचा श्टॉक चांगलाय. रमाकाकी लग्नपत्रिकेची प्रूफं नीट तपासून घ्या.’ अशा आर्डरी सोडणारा नारायण या बजेटमध्ये महिलांसाठी काय काय आहे ते सांगतोय.

बातम्या आणखी आहेत...