आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रद्रोह्यांविरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा १७ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी मुंबई येथे आयोजित केला आहे. त्या महामोर्चामध्ये संभाजी ब्रिगेडचा सक्रिय सहभाग असून मोठ्या संख्येने राज्यभरातून उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
सातत्याने महाराष्ट्राच्या राज्यपालाकडून आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून महापुरुषांचा ठरवून अपमान केला जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे खच्चीकरण होत आहे. आणि दिल्लीश्वरांचे लांगूलचालन सुरू असून सीमा प्रश्नावरचा नेभळटपणा व शेतकऱ्यांविषयीची अनास्था आणि घटनाबाह्य सरकारचा मिंधेपणा याविरुद्ध हा मोर्चा असल्याचे संभाजी बिग्रेडकडून सांगण्यात आले.
हरहर महादेव चित्रपट आधी संभाजी ब्रिगेडला दाखवा
इतिहासाची मोडतोड करणारा अक्षपार्य हरहर महादेव या चित्रपटावर संभाजी ब्रिगेडसह अनेक शिवप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतले होते. आणि हा चित्रपट चित्रपटगृहात बंद पाडला होता. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी हा चित्रपट झी मराठी वाहिनीवरून प्रदर्शित होणार असल्याचे कळाल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेडच्या टीमने झी मराठीच्या स्टुडिओला निवेदन दिले.
हा चित्रपट प्रदर्शित करू नये असे पत्रात सांगण्यात आले होते. त्यानंतर झी स्टुडिओकडून अक्षपार्य भाग वगळून चित्रपट दाखवला जाईल अशा आशयाचे पत्र काढले आहे. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही झी स्टुडिओचे अभिनंदन करतो. परंतु नेमके कुठला आक्षेपार्य भाग काढला आहे हे कळण्यासाठी १८ तारखेपूर्वी झी स्टुडिओने संभाजी ब्रिगेडसह शिवप्रेमींना हा चित्रपट दाखवावा अन्यथा प्रदर्शित करतेवेळी आक्षेपार्ह्य बाबी जर चित्रपटात असेल तर संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने कारवाई करेल. होणाऱ्या परिणामाची जबाबदारी झी मराठी स्टुडिओची आणि सरकारची असेल असेही पत्रात नमुद असल्याचे संभाजी बिग्रेडकडून सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.