आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:वीज गेल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण ; सनी सेंटर हाऊससमोरची घटना

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर फोन केला, पण अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त तीन जणांनी महावितरण कार्यालयात जाऊन तेथे उपस्थित कर्मचाऱ्याला मारहाण केली. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता सनी सेंटर येथील पाॅवर हाऊसमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी अनोळखी तिघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन हिंमतराव शेवाळे (४०, रा. समृद्धीनगर) हे ऑपरेटर १ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता महावितरण कार्यालयात बसले होते. तीन तरुण कार्यालयात आला. ‘आमची दुपारपासुन लाइट गेलीये, साहेब काेण आहे,’ अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी सहायक अभियंता आर. पी. राठोड यांचे नाव सांगितले. त्यांना लगेच शिवीगाळ करून फोन नंबर मागितला. शेवाळे यांनी तो दिला, तरुणांनी फोन केला पण राठोड यांनी प्रतिसाद दिला नाही. त्याचा राग आल्याने तीन तरुणांनी धमकी देऊन शेवाळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. शेवाळे यांनी वरिष्ठांना हा प्रकार सांगितल्यानंतर २ ऑगस्ट रोजी सिडको ठाण्यात तक्रार देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...