आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या ठाणे, मुलुंड,भांडुप, नवी मुंबई, बेलापूर, पनवेल, तळोजा व उरण या भागामध्ये वीज वितरण करण्याचा परवाना अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड नवी मुंबई या खाजगी भांडवलदार कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेला आहे. याविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (२ जानेवारी) विराट मोर्चा काढण्यात आला.
अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला वीज वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराला कायम करावे, तिन्ही वीज कंपन्यातील ४२ हजार रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी.
१ एप्रिल २०१९ नंतर कार्यान्वित केलेले उपकेंद्र ठेकेदारी पद्धतीने चालविण्यास देण्याची पद्धत बंद करावी, एम्पॅनलमेंटद्वारे काम करण्याची पद्धत बंद करावी
महानिर्मिती कंपनीतील जलविद्युत केंद्र खाजगी भांडवलदारांना देण्यात येऊ नये
महाराष्ट्रातील जनतेच्या मालकीचा वीज उद्योग खाजगी भांडवलदारांना देऊ नये यास विरोध करण्याकरीता दि.२ जानेवारी २०२३ रोजी निर्मिती, पारेषण, वितरण कंपन्यातील वीज कामगार, अभियंते,अधिकारी,कंत्राटी कामगार विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना,वीज ग्राहकांच्या संघटना यांचा विराट मोर्चा दुपारी १२ वाजता अधिक्षक अभियंता कार्यालय महावितरण कंपनी ठाणे येथून आयोजित करण्यात आला होता.
15 हजारांवर वीज कर्मचारी सहभागी
कर्मचारी,अभियंते,अधिकारी,कंत्राटी कामगार,राजकीय पक्षाचे नेते,सामाजिक संघटनां व कामगार संघटनांचे नेते,वीज कंपन्यातील कंत्राटदार सकाळपासूनच उपस्थित होते.या मोर्चाला सुरुवातीला ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हजारो कर्मचारी यांनी महावितरण कंपनी ठाणे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात संघर्ष समितीचे नेते कॉम्रेड कृष्णा भोयर,संजय ठाकूर,अरुण पिवळ,संजय मोरे,आर.टी. देवकांत,सय्यद जहिरोद्दीन, संजय खाडे, प्रवीण बागुल, राजन भानुशाली,राकेश जाधव,नवनाथ पवार,एस.के.लोखंडे,विवेक महाले,संदीप वंजारी,सुयोग झुटे, उत्तम पारवे,राजन शिंदे, नचिकेत मोरे,एस.एम.शरीकमसलत,शिवाजी वायफळकर, प्रकाश गायकवाड, प्रवीण वर्मा, आर.डी. राठोड,राजअली मुल्ला, मुकुंद हनवते,श्रीमती नेहा मिश्रा,प्रभाकर लहाने, नागोराव पराते,अनिल तराळे, आर.एच.वर्धे,ललित शेवाळे इत्यादी पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
महावितरणच्या कार्यालयापासून ते मुलुंड चेक नाका वागळे पर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली.मुलुंड चेक नाका येथे मोर्चा अडविण्यात आला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संघर्ष समितीच्या वतीने जनतेच्या भावना राज्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्यापर्यंत पोहोचावे अशी विनंती केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.