आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेश्वरी उत्पत्ती दिवस:वाळूजमध्ये दोन वर्षांच्या खंडानंतर भव्य मिरवणूक काढून साजरी केली महेश नवमी

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिवर्षी प्रमाणे यंदा मागील दोन वर्षांच्या खंडानंतर वाळूज औद्योगिक परिसरातील श्री माहेश्वरी मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात श्री महेश नवमी अर्थातच माहेश्वरी उत्पत्ती दिवस साजरा केला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे महेश नवमी साजरा करता न आल्याने यंदा समाजबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महेश नवमी साजरी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित महिला-पुरुष व भजनीमंडळीनी जय महेशचा नारा देत पालखी सोहळ्याला सुरुवात केली.

यावेळी सजीव देखावा तयार करून रथातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री माहेश्वरी मंडळ औरंगाबादचे अध्यक्ष संतोषज लढ्ढा तर डॉ. पुरुषोत्तम दरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मंचावर श्री माहेश्वरी महिला मंडळ औरंगाबादच्या अध्यक्षा विजया काबरा, वाळूज प्रभागचे प्रमुख डॉ. स्वरूप लाहोटी, सचीव ललित बंग, जुगल लाहोटी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथीच्याहस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धाच्या विजेत्तांना बिक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...