आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी भटकंती:सरासरी 1200 मिमी पाऊस तरी माहूर तहानलेले; पेल्याने भरावे लागतेय पाणी

शरद काटकर | नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिलपासून अधिग्रहित विहिरीने गाठला तळ - Divya Marathi
एप्रिलपासून अधिग्रहित विहिरीने गाठला तळ
  • हंडाभर पाण्यासाठी एक तासाचा वेळ

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या माहूर तालुक्यातील माळ पठारावरील गावांमध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे. एकीकडे तालुक्यात दरवर्षी १२०० ते १४०० मिलिमीटर पाऊस होत असताना याच तालुक्यातील मांडवा गावात मात्र तळ गाठलेल्या विहिरीतून पेल्याने पाणी उपसावे लागत आहे. या गावात 152 कुटुंबे असून, गावाची एकूण लोकसंख्या 952 आहे.

या गावात २२ वर्षांपूर्वी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. मात्र, ठिकठिकाणी पाइपलाइन फुटल्याने गावात अद्याप पाणी पोहोचलेच नाही. दरम्यान, प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या विहिरीनेही तळ गाठला आहे. गावात टँकर सुरू असले तरी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मांडवा येथे पाणीपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी मांडव्याच्या सरपंच सीमा राठोड यांनी केली.

हंडाभर पाण्यासाठी एक तासाचा वेळ
मांडवा गावात १० विहिरी खासगी मालकीच्या अाहेत. तर दाेन विहिरी ग्रामपंचायतीने अधिग्रहीत केल्या अाहेत. याच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून पेल्याने पाणी भरावे लागते. ते पाणी २०० मिटर अंतरावरील घरी पाेहचेपर्यंत महिलांचा एक तास वेळ लागतो.

बातम्या आणखी आहेत...