आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहरमनिमित्त शहरातील विविध भागांमध्ये ८० पेक्षा जास्त सवाऱ्या बसवण्यात येतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांत सवाऱ्या बसल्या होत्या, परंतु मजम्याचे आयोजन टाळले हाेते. यावर्षी निर्बंध उठल्याने सालाबादप्रमाणे ९ ऑगस्ट रोजी सिटी चौक येथे बडे चांद साहब, छोटे चांद साहबसह विविध सवाऱ्यांच्या मजम्याचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारी चंद्रदर्शन झाल्याने ३१ जुलै रोजी शहरातील विविध भागांमध्ये सवाऱ्या बसवण्यात येणार आहेत. ९ ऑगस्ट रोजी यौमे अशुराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सिटी चौकात मजमा होणार आहे, अशी माहिती भडकल गेट येथील बडे चांद साहब सवारीचे मुतवल्ली व मुजावर मोहंमद जावीद यांनी दिली.
येथे बसवतात सवाऱ्या भडकल गेट येथील बडा अशुरखाना बडे चांद साहब, चेलीपुरा येथील छोटे चांद साहब, बेगमपुरा येथील संदल साहब, मकाई गेट येथील इमान खासीम, शहागंज येथील संदल साहब मौला पंजा, शहाबाजार येथील नशान जिन्सी, खास गेट, जाफर गेट, रेंगटीपुरा, बायजीपुरा, मिसारवाडी, उस्मानपुरा, छावणी आदी भागांत सवाऱ्या बसवण्यात येतात. मोहरम महिन्याच्या दहा तारखेला म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरनुसार ९ ऑगस्ट रोजी सवाऱ्या उठवण्यात येणार आहेत.
जगातले पहिले लिखित संविधान मोहरममध्येच लागू मोहरा महिन्यातच मोहंमद पैगंबर यांनी जगातले पहिले लिखित संविधान सौदी अरेबियातील मदिना येथे लागू केले होते. त्याचे नाव मिसाक-ए-मदिना असे होते. यात बहुसंख्याक, अल्पसंख्याक, वंचित सर्वांना त्यांचे हक्क प्रदान करण्यात आले होते.
पैगंबर राज्यव्यवस्था स्थापन दिवस म्हणून मोहरम महिन्याचे महत्त्व शेवटचे प्रेषित मोहंमद पैगंबर (स.) यांनी सन ६२० मध्ये पैगंबर राज्यव्यवस्था स्थापन केली होती. त्यानुसार मानवता, शांती, समता, बंधुता याला सर्वप्रथम स्थान देण्यात आले होते. खलिफा निवडीवरून मोहंमद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन यांनी इराक येथील करबला येथे सशस्त्र लढा दिला होता. त्यात इमाम हुसेन शहीद झाले होते. म्हणून मोहरम महिन्याला विशेष महत्त्व आहे. मोहरमच्या नऊ व दहा तारखेला अनेक जण रोजे ठेवतात, अशी माहिती इस्लाम धर्माचे अभ्यासक नौशाद उस्मान यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.