आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी कारवाई:कर्नाटकातून आलेला 50 लाख रुपयांचा वजीर गुटख्यासह एक कंटनेर जप्त; वसमत पोलिसांची मोठी कारवाई

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कर्नाटकातून वसमत येथे विक्रीसाठी आलेला 50 लाख रुपयांचा वजीर गुटखा शनिवारी ता. 21 दुपारी पोलिसांनी जप्त केला आहे. असून या प्रकरणात कंटेनर चालकाची कसून चौकशी केली जात आहे. बेंगलोर येथून हा गुटका वसमत येथे आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होऊ लागले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातून एका कंटेनरमध्ये (केए 01 एई 1472) 50 बोरी गुटखा वसमत शहरात आज सकाळी आला होता. सदरील कंटेनर वसमत ते परभणी मार्गावर उड्डाणपुलाच्या खाली थांबला होता.

यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक विलास खारडे, जमादार भगीरथ सवंडकर, साईनाथ कंठे, प्रशांत मुंडे, बालाजी जोगदंड, दिलीप पोले यांच्या पथकाने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कंटेनर उभ्या असलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी पोलिसांनी चालक परवेज पाशा याची चौकशी केली.

कंटेनर मध्ये काय आहे याची माहिती विचारली असता त्यास समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी कंटेनर उघडून पाहिले असता त्यात वजीर गुटख्याच्या 50 बोऱ्या आढळून आल्या. पोलिसांनी सदरील गुटखा जप्त केला असून या गुटख्याची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे.

पोलिसांनी चालक परवेज पाशा याची चौकशी सुरू केली असून हा गुटखा बेंगलोर येथून कोणत्या भागातून वसमत येथे आणण्यात आला होता. तसेच वसमत येथे गुटखा नेमका कोणाकडे आणण्यात आला याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे हिंगोली ते कर्नाटक असे गुटखा विक्रीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...