आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची मागणी:म्हणाले- उद्धव ठाकरे आजारी आहेत, तोपर्यंत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी आहे. त्यामुळे राज्याचा कारभार चालवण्यासाठी कुणीतरी मुखिया हवा आहे. त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे हे सक्षम आहे त्यांना मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे?, असा पर्याय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला सुचवला आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. ते आजारातून लवकर बरे व्हावेत अशी आमच्या पक्षाची आणि माझी व्यक्तिगत भूमिका आहे. त्यांनी या राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध व्हावे, पण जर ते लवकर बरे होईपर्यंत तर या राज्याला प्रमुख तर नेमला पाहिजे. मुखियाविना हे राज्य कसे चालेल? एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही.
दरम्यान, कुणालाही द्या, राष्ट्रवादीला द्या, अजित पवारांना द्या. संधी दिली पाहिजे, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या गैरहजेरीवरुनही भाजपचे टीकास्त्र
नुकत्याच संपन्न झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाही मुख्यमंत्री अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरुन विरोधकांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती.

बातम्या आणखी आहेत...