आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण:पर्यावरणासह राष्ट्रीय एकात्मता विषय शाळेत अनिवार्य करा : डॉ. शाहेद शेख

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच संविधानाचे रक्षण करण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणासह ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा विषय अनिवार्य करावा. यामुळे समाजिक प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे मत वरिष्ठ पत्रकार प्रा. डॉ. शाहेद शेख यांनी केले.

स्कॉलर्स ग्रुप ऑफ स्कूलतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोज गार्डन येथे राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरण या विषयांवर आयोजित चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी स्कॉलर्सचे संचालक मुजतबा मुनीब, डॉ. मुदससीर, शेख इम्रान, मुख्याध्यापिका वासिमऊनीसा, नाझेरा बानो उपस्थित होते. या स्पर्धेत विविध शाळांच्या ३२१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले.

हे आहेत विजेते : लहान गटात अरफाईन, मैरा फातिमा, सौलिहा आसिफ, मध्यम (ब्रिलियंट आर्टिस्ट) गटात अश्मीरा पठाण, सिदराह फातिमा व अनफा फातिमा तर मोठ्या (फिलॉसॉफर आर्टिस्ट) गटात असका फातिमा, शेख रमशा व दीक्षिता उमेश यांनी अनुक्रमे पहिले, द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले. झेबा अंजुम आणि अख्तर यांनी सूत्रसंचालन केले तर काझी शमसिया यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...