आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा लालबावटा शेतमजुरी यांच्या वतीने सोमवारी खोकडपुरा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गायरान जमीन कसणाऱ्या लोकांच्या नावावर सातबारा करून देण्यात यावा तसेच बांधलेल्या घराचे पीआर कार्ड देण्यात यावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आल्याची माहिती बुद्धिनाथ बराळ यांनी दिली आहे
बराळ म्हणाले की आजपर्यंत ज्या लोकांनी गायरान जमीनीवर अतिक्रमण करून जमीन कसत आहेत व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत त्यांनी बंजर जमीन आपल्या मेहनतीने सुपीक बनवल्या आहेत. या जमीनीवरच या कुटूंबाचा मागील 40-50 वर्षापासून व अलिकडे काही कुटूंबे 20-25 वर्षापासून या जमीनीवर आपला गुजारा करत आहेत.
लाखो लोक रोडवर येतील
या जमीनीमुळे लाखो बेरोजगार व भूमिहिन लोकांना जगण्याचे साधन मिळाले आहे व अनेक कुटूंबे तेथेच घरे बांधून राहात आहेत. जर शासनाने या जमीनीतून बेदखल केले व त्यांची घरे पाडली तर अशा लाखो कुटूंबांतील लोक रस्त्यावर येतील. त्यांना जगण्यासाठी काही साधन ही राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी. सदर जमीनीवर जास्त करून आदिवासी, दलित, पारधी, माळी आदि भटक्या व इतर मागास प्रवर्गातील कुटूंबे आहेत.
ही भूमिहिन कुटूंबे या शेतीवर आपले जीवन जगत आहेत.तसेच वाळूज,पंढरपूर, जोगेश्वरी, वडगाव कोल्हाटी, नारायणपुर, नायगाव या गावासह जिल्ह्यातील बहुतांश गावात मागील 30-40 वर्षांपासून सर्वजाती धर्मातील गरीब लोक पक्की घरे बांधून येथे वास्तव्य करीत आहेत. या गरीबांची घरे पाडू नयेत व त्यांना बेघर करू नये अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. बत राज्य सरकारने उच्च न्यायालयात आपली बाजू मांडून गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी नंदकिशोर काबरा नामदेव मोरे याच्या विविध पदाधिकारी सह भागी झाले होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.