आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाजारातील रासायनिक रंगामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळे नैसर्गिक रंगाने होळीचा आनंद घ्या. घरात वापरणाऱ्या वस्तूंपासून नैसर्गिक रंग तयार करा, असे सांगून सुलभा जोशी यांनी नैसर्गिक रंग बनवण्याच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. सिडको एन-७ येथील गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीने शनिवारी धूलिवंदन सणानिमित्त नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा झाली. गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, रमाकांत रौतल्ले, शिल्पा अस्वलीकर उपस्थित होते. होळीसाठी विविध रंग बाजारात येतात. परंतु घरातील भाजीपाला, इतर साहित्यापासून नैसर्गिक रंग बनवता येतात, असे जोशी यांनी प्रात्यक्षिकातून सांगितले.
नैसर्गिक ओला रंग बनवण्याची पध्दत : पालक किंवा पुदिना पाण्यात उकडल्यानंतर ते कुस्करून घेतल्यास हिरवा रंग तयार होतो. उकडलेले पालेभाज्यातील पाणी थंड झाल्यानंतर त्यात सोडा टाकला तर हिरवा रंग होतो. बीटचे बारीक-बारीक तुकडे करून ते शिजवून घ्यायचे. त्यानंतर ते पाणी गाळून घेतले तर जांभळा रंग तयार होतो. त्यात सोडा टाकला तर जास्त काळ रंग राहतो. हळदीपासून पिवळा रंग तयार होतो. बाजारात मिळणाऱ्या मंजिष्ठा आणून त्या जर उकळून घेतल्यास त्यापासूनही केशरी रंग तयार होतो.
कोरडा रंग बनवण्याची पध्दत
ओल्या रंगासोबतच कोरडा रंगसुद्धा घरातील वस्तू वापरून करता येते. हळदीमध्ये बुक्का मिश्रित केल्यास हिरवा रंग तयार होतो. हळदीमध्ये सोड्याचे पाणी किंवा चुना टाकला तर लाल रंग तयार होतो. पळसाच्या फुलांच्या वापरातून केशरी आणि रात्री पाण्यात भिजवून ठेवली तर ओला केशरी रंग तयार होतो. चंदनाच्या पावडरपासून पिवळा रंग होतो. जास्वंदाच्या फुलांच्या पावडरमध्ये अर्धा कप हळद, चिमूटभर चुना टाकला तर लाल रंगाची निर्मिती होते. अशा प्रकारे झेंडूची फुले, पारिजातकाच्या फुलांपासूनही रंग तयार करता येतात, असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.