आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकारात आढळून आलेल्या विद्यार्थ्यांची बोर्डाच्या नियमानुसार चौकशी होणार आहे. यासाठीच्या होणाऱ्या सुनावणीला 24 मार्चपासून सुरुवात होणार असल्याची माहिती विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली असून, नियमानुसार संबंधित प्रकारात कार्यवाही केली जाणार आहे.
विभागीय शिक्षण मंडळात 24 मार्च पासून या सुनावणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास वेगळवेगळ्या तारखेस बोलवण्यात आले आहे. त्यांना दिलेल्या वेळ आणि तारखेला त्यांनी बोर्डात हजर राहणे आवश्यक आहे. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॉपी प्रकरणांनी गाठली शंभरी
राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी नाना प्रकारचे पर्याय वापरूनही कॉपीमुक्त परीक्षेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये राज्यात आतापर्यंत शंभराहून अधिक कॉपी प्रकरणे उघडकीस आले आहेत.
बारावीच्या गणित विषयाच्या पेपरमध्ये एक विद्यार्थी उत्तरपत्रिका घेवून पळून गेला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विद्यार्थ्यावरील पोलिस कारवाई सुरु राहणार असून बोर्डातील कार्यवाही देखील नियमानुसार होईल. यासाठी सर्व गैर प्रकारातील विद्यार्थ्यांची सुनावाणी करुन त्यांचे म्हणणे ऐकून कार्यवाही केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
करोनानंतर परीक्षा
बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी पासून तर दहावीच्या परीक्षा या 2 मार्च पासून सुरु झाल्या. कोरोनानंतर थेट बारावी बोर्ड परीक्षेला विद्यार्थी सामोरे जात आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यातून 629 केंद्रावर दहावी परीक्षेला 1 लाख 80 पेक्षा अधिक विद्यार्थी बसले आहेत. तर बारावीचे 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.