आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:जोडपिंपरी येथे अनैतिक संबंधातून महिलेने केला इसमाचा खून, संशयावरुन महिला औंढा नागनाथ पोलिसांच्या ताब्यात

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ पोलीस ठाण्यांतर्गत जोडपिंपरी शिवारात सिद्धेश्वर धरणाच्या काठावर एका ४५ वर्षाचा व्यक्तीचा मृतदेह बुधवारी (ता. २२) दुपारी तीन वाजता आढळून आला आहे. मृतदेहाच्या अंगावरील खुणा लक्षात घेता अनैतिक संबंधातून महिलेने खून केल्याची शक्यता असून पोलिसांनी एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोड पिंपरी येथील भागोराव प्रल्हाद पोली (वय 45) हे सोमवार 20 तारखेपासून बेपत्ता होते त्यांचे वडील प्रल्हाद पोले व इतर कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही त्यानंतर आज पोले कुटुंबीयांनी सिद्धेश्वर धरणाच्या परिसरात पाहणी सुरू केले. यामधे काही दगडांमधून दुर्गंधी येत असल्याचे आढळून आले त्यामुळे या भागात पाहणी केली असता तेथे एक मृतदेह असल्याचे दिसून आले होते

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर औंढानागनाथ पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे नायब तहसीलदार सचिन जोशी जमादार घुगे गिरी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दगडाखाली असलेल्या मृतदेह बाहेर काढला असता सदर मृतदेह भागोराव पोले यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान  मृतदेहाच्या चेहऱ्यावरील व अंगावरील खुणा लक्षात घेता पोले यांचा खून झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. अनैतिक संबंधातून त्यांचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशी मध्ये स्पष्ट होत असून पोलिसांनी एका महिलेलाही ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे सदर महिलेच्या घरामध्ये मोठा खड्डा आढळून आला. त्यामुळे पोले यांचा खून करून त्यांचा मृतदेह घरात पुरण्याचा त्या महिलेचा डाव होता. मात्र आपण पकडले जाऊत या भितीने त्या महिलेने मयत पोले यांचा मृतदेह सिद्धेश्वर धरणाच्या काठावर फेकून दिला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असावा असा अंदाजही पोलिसांनी काढला असून त्यादृष्टीने माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत औढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.