आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड:अनैतिक संबंधाचा उलगडा करणार्‍याचा प्रेमी युगूलाकडून खून;देगलूर तालुक्यातील घटना; दोघांना अटक

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देगलूर तालुक्यातील पोलिस ठाणे मरखेल अंतर्गत येणार्‍या मौजे कुडली येथे अनैतिक संबंधाचा उलगडा करणार्‍या एका २७ वर्षीय युवकाचा प्रेमी युगूलाकडून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मौजे कुडली येथील रहिवासी हानमंत पुंडलिक जाधव यांनी एक जानेवारीपासून आपला मुलगा जगदीश (वय २७) हा घरातून निघून गेला व नातेवाईकाकडे शोध घेतल्यानंतरही कुठेच सापडत नसल्यामुळे सहा जानेवारी रोजी पोलिस ठाणे मरखेल येथे मिसिंग तक्रार दाखल केली होती. या दरम्यान २५ फे्रबुवारी रोजी कुडली शिवारात एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्याची कवटी आढळून आल्याची माहिती मरखेल पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरिक्षक आदित्य लोणीकर व पोलिस उपनिरिक्षक अजित बिरादार यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

चंदरबाई जाधव यांच्या शेतातील वाढलेल्या गवतात माणसाच्या अवयवाची काही हाडे कपडे चप्पल आढळून आले. यावेळी मिसिंग दाखल केलेल्या पुंडलिक जाधव यांना घटनास्थळी दाखवले असता कपड्यावरून त्यांनी आपलाच मुलगा असल्याची ओळख पटवली. यानंतर त्यांनी आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गावाकडे फिरविली.

डोळ्यात मिरची पूड टाकून दाबला गळा

मृत जगदीश यांच्या शेजारी असलेली विवाहित महिला अनुसया संतोष गोंदे (वय २७) व त्याच गावात राहणारा शुभम मोहन चिलमपाढे (वय २२) यांच्यात प्रेम सूत जुळले होते. हे जगदीशला कळाले होते. यातच जगदीशने या प्रेम प्रकरणाची माहिती गावकऱ्यांना सांगणार असल्याचे सांगितले. यानंतर आपल्या प्रेमाचा उलगडा होणार, अशी भीती आरोपी अनुसया गोंदे व शुभम चिलमपाडे यांनी २ जानेवारी रोजी मध्यरात्री कुडली शिवारात जगदीशच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून गुप्तांगावर, डोक्यावर व तोंडावर लाथाबुक्क्यांनी वार करून गळा दाबून त्याला ठार मारले.

ही घटना लपवण्यासाठी त्याचा मृतदेह चंदर बाई जाधव यांच्या शेतात नेऊन टाकण्यात आला, अशी कबुली तपासा दरम्यान आरोपीकडून देण्यात आली. यानंतर तपासणी अधिकारी अजित बिरादार यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपीविरुद्ध खुनाचा गुुन्हा दाखल झाला. आरोपींना देगलूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायमूर्ती सुधीर बारटक्के यांनी सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...