आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया (क्यूसीएफआय) इंडस्ट्रीतील गुणवत्ता वाढीसाठी काम करते. मागील २४ वर्षांत शहरातील उद्योगांत यामुळे आमूलाग्र बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे. आता यापुढे जाऊन घराघरात ‘फाइव्ह एस’ कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात घरात या प्रणालीचा वापर करण्याविषयी चर्चा झाली.
बडोद्यातील अंकलेश्वर चॅप्टरच्या सुधा मुजुमदार म्हणाल्या, फाइव्ह एस ही जपानी प्रणाली आहे. यामध्ये कामाला शिस्त लागते, यातून वेळेची आणि श्रमाची बचत होते. मुळात फाइव्ह एस ही कार्यपद्धती नसून तो एक संस्कार आहे. जपानी लोकांनी याला साच्यात बसवून प्रयोगांतून सिद्ध करून दाखवले. इंडस्ट्रीत गेली अनेक वर्षे आम्ही हे अवलंबतो आहोत. याचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत.
इंडस्ट्रीतील परिणामकारकता सिद्ध झाल्याने घरात राबवणार ही संकल्पना औरंगाबादेतही होईल सुरू क्यूसीएफआय ही व्यक्तीची गुणवत्ता वाढण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करण्याचे कौशल्य शिकवते. इंडस्ट्रीत सिद्धता मिळाल्याने आता कुटुंबातही याचा वापर करून लोकांना प्राेत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अधिवेशन संपल्यानंतर आम्ही शहरात याचे काम सुरू करू. - नितीन किनगावकर, अध्यक्ष, क्यूसीएफआय, औरंगाबाद चॅप्टर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.